पाकिस्तानमध्ये पुढच्या वर्षी आशिया चषक 2023 खेळला जाणार, असे ठरले होते. पण बीसीसीआयचे सचिव जय शहा या स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तान करणार नसल्याचे स्पष्ट केले. भारतीय संघ आशिया चषक 2023 साठी पाकिस्तान दौरा करणार नाही, असे त्यांनी सांगितले आहे. मंगळवारी जय शहा बीसीसीआयच्या सचिवपदी पुन्हा एकदा नियुक्त झाले आहे. पदभार पुन्हा स्वीकारल्यानंतर त्यांनी आगामी आशिया चषकाविषयी ही मोठी माहिती दिली. शहाच्या या वक्तव्यानंतर आता पाकिस्तान क्रिकेटच्या दिग्गजांकडून देखील प्रत्युत्तरे येऊ लागली आहेत.
पाकिस्तानचे माजी सलामीवीर फलंदाज सईद अनवर (Saeed Anwar) यांनी देखील जय शहा (Jay Shah) यांच्या या वक्तव्यानंतर मोठी प्रतिक्रिया दिली. अनवरच्या मते जर इतर संघ आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू पाकिस्तानमध्ये खेळण्यासाठी तयार असतील, तर भारतालाच काय अडचण आहे. त्यांनी यावेळी बीसीसीआय आणि जय शहा यांच्यावर स्पष्ट शब्दात निशाणा साधला आहे. जय शहांच्या मते आगामी आशिया चषक न्युट्रल वेन्यूवर खेळवला गेला पाहिजे. याच पार्श्वभूमीवर अनवरने देखील पुढच्या वर्षीचा एकदिवसीय विश्वचषक अशाच प्रकारे न्युट्रल वेन्यूवर खेळला गेला पाहिजे, जो भारतात खेळला जाणार आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने याविषयी आयसीसीशी चर्चा केली पाहिजे, असेही अनवर म्हणाले.
“सर्व आंतरराष्ट्रीय संघ आणि खेळाडू सीएसएल खेळण्यासाठी पाकिस्तानमध्ये येतात. मग एकट्या बीसीसीआयला काय अडचण आहे. बीसीसीआय जर आशिया चषक 2023 एखाद्या न्युट्रल वेन्यूवर नेण्यासाठी तयार असेल, तर पीसीबी देखील याविषयी निर्णय घेईल. पुढच्या वर्षीचा एकदिवसीय विश्वचषक न्युट्रल वेन्यूवर खेळवला जावा अशी पीसीबीची इच्छा असेल,” असे अनवरने ट्वीटमध्ये लिहिले. दरम्यान, 1997 मध्ये पाकिस्तान संघ भारत दौऱ्यावर आला होता. तेव्हा अनवरने चेन्नईमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात 194 धावांची महत्वपूर्ण खेळी केली होती.
When all international teams and international cricketers come to Pakistan for @OfficialPSL, what is @BCCI's problem. If BCCI is willing to go to a neutral venue, then @TheRealPCB should also be willing to go to a neutral venue for the WC in India next year.#PAKvIND #Cricket
— Saeed Anwar (@ImSaeedAnwar) October 18, 2022
भारतीय क्रिकेट संघ 2008 नंतर एकदाही पाकिस्तान दौऱ्यावर गेला नाहीये. त्यावेळी आशिया चषकासाठीच संघ पाकिस्तानला गेला होता. दोन्ही देशांतील खराब राजकीय संबंधांमुळे भारत सरकार संघाला पाकिस्तान दौऱ्यावर जाण्याची परवानगी देत नाही. सध्या फक्त जेव्हा आयसीसी स्पर्धा असतील, तेव्हाच हे दोन्ही संघ एकमेकांसोबत खेळतात.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
प्रो कबड्डी: अखेरच्या सेकंदात पुणेरी पलटणचा थरारक विजय; पुणेकर अस्लम इनामदार ठरला हिरो
ऋतुचे ‘राज’! एकाच आठवड्यात ठोकले सलग दुसरे टी20 शतक; महाराष्ट्राची विजयी घौडदौड कायम