बेंगलोर येथे सुरू असलेल्या दक्षिण आशियाई फुटबॉल चॅम्पियनशिप म्हणजेच सॅफ कप स्पर्धेत शनिवारी (1 जुलै) भारत विरुद्ध लेबनॉन असा उपांत्य फेरीचा सामना खेळला गेला. पूर्णवेळ तसेच अतिरिक्त वेळेत गोल शून्य अशा बरोबरीत राहिलेल्या सामन्यात अखेर पेनल्टी शूट आऊटवर निर्णय घेण्यात आला. यामध्ये यजमान भारतीय संघाने 4-2 असा विजय मिळवत, अंतिम फेरीत प्रवेश केला.
https://www.instagram.com/p/CuKZHsTBaOd/?igshid=NTc4MTIwNjQ2YQ==
साखळी फेरीच्या सामन्यांमध्ये दोन विजय व एक बरोबरी अशी कामगिरी करत यजमान संघाने उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. काही दिवसांपूर्वी झालेल्या इंटरकॉन्टिंनेंटल फुटबॉल कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने पराभूत केलेल्या लेबनॉन संघाविरुद्ध भारताला हा उपांत्य फेरीचा सामना खेळायचा होता.
सामना सुरू झाल्यानंतर दोन्ही संघांनी आक्रमक खेळ दाखवला. पहिल्या सत्रात भारताला गोल करण्याची दोन संधी मिळाल्या होत्या. मात्र, या संधी भारतीय संघ साधू शकला नाही. दुसऱ्या हाफमध्ये देखील अशाच प्रकारचा खेळ दोन्ही संघांनी दाखवला. मात्र, पूर्ण वेळेत दोन्ही संघ गोल करू शकले नाहीत.
पूर्ण वेळानंतर अतिरिक्त वेळेत देखील दोन्ही संघ गोल करण्यात अपयशी ठरले. त्यानंतर पेनल्टी शूट आउटमध्ये पोहोचलेल्या या सामन्यात भारतीय संघाने संयम दाखवला. भारताकडून कर्णधार सुनील छेत्री, अन्वर अली, नाओरेम व उदांता सिंग यांनी गोल केले. तर, लेबनॉनसाठी चार पैकी दोन खेळाडू गोल करण्यात अपयशी ठरले.
(SAFF CUP India Beat Lebanon And Entered In Finals)
महत्वाच्या बातम्या-
‘मी तर हार्दिक पंड्याच्या आसपासही नाही…’, संघातून ड्रॉप करण्यावर प्रमुख खेळाडूचे खळबळजनक विधान
वनडे विश्वचषकात भारतासाठी चौथ्या क्रमांकावर कोण खेळणार? ‘हे’ आहेत पाच पर्याय