भारताचे पहिले विश्वविजेते कर्णधार कपिल देव यांना हृदविकाराचा झटका आल्याने हॉस्पिटलमध्ये हालवण्यात आले आहे. माध्यमांतील वृत्तानुसार त्यांच्यावर एंजिओप्लास्टी करण्यात आली आहे. पण अजून त्यांच्या तब्बेतीबद्दल आणखी माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे चाहत्यांपासून ते क्रिकेटपटूंपर्यंत सर्वजण त्यांच्या लवकरात लवकर बरे होण्याची प्रार्थना करत आहेत.
सचिन तेंडूलकर, विराट कोहली, शिखर धवन, सुरेश रैना, इरफान पठान अशा अनेक भारतीय खेळाडूंनी कपिल यांच्यासाठी प्रार्थना केली आहे.
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने ट्विटरवर लिहिले आहे की, “स्वत:ची काळजी घ्या कपिल पाजी. तुम्ही लवकरात लवकर बरे व्हावी, एवढीच प्राथर्ना करतो. ”
Take care @therealkapildev! Praying for your quick recovery. Get well soon Paaji. 🙏🏼
— Sachin Tendulkar (@sachin_rt) October 23, 2020
तर भारताचा कर्णधार विराट कोहलीने ट्विट केले आहे की, “तुम्ही त्वरित बरे व्हावे, हीच प्राथर्ना.”
Praying for your speedy recovery. 🙏🏻 Get well soon paaji. @therealkapildev
— Virat Kohli (@imVkohli) October 23, 2020
तर कपिल यांचे संघसहकारी माजी अष्टपैलू मदनलाल शर्मा यांनीही म्हटले आहे की, “ज्यांनीही कपिल यांची परिस्थिती जाणून घेण्यासाठी फोन केला होता. त्यांच्या सर्वांच्या प्रार्थना कपिल यांच्या कुटुंबियांपर्यंत पोहोचवण्यात आल्या आहेत. स्वस्थ राहा आणि लवकर मजबूत हो कपिल.”
To those who have called to inquire your prayers and wishes are conveyed to the family and received with gratitude . Good health and strength kaps .@aajtak @therealkapildev @vijaylokapally @
— Madan Lal (@MadanLal1983) October 23, 2020
Wishing you a speedy recovery @therealkapildev sir. Strength always.
— Shikhar Dhawan (@SDhawan25) October 23, 2020
My prayers are with you 🙏 hope you get well soon #Kapildev paji
— Irfan Pathan (@IrfanPathan) October 23, 2020
Wishing you a speedy recovery @therealkapildev Sir .. Take care & God Bless 🙏
— Suresh Raina🇮🇳 (@ImRaina) October 23, 2020
कपिल यांनी भारताकडून १९७९ चे १९९४ पर्यंत १६ वर्षे क्रिकेट खेळले. यात त्यांनी अनेक अविश्वसनीय खेळी केल्या. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत अष्टपैलू कामगिरी करताना वनडेमध्ये २२५ सामन्यात २५३ विकेट्स आणि ३७८३ धावा केल्या आहेत, तर कसोटीमध्ये १३१ सामन्यात ४३४ विकेट्स आणि ५२४८ धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
भारताचे दिग्गज क्रिकेटपटू कपिल देव यांना हृदयविकाराचा झटका, रुग्णालयात उपचार सुरु
CSK चाहत्यांनो नाराज होऊ नका! अजूनही चेन्नई पोहचू शकते प्लेऑफमध्ये, अशी आहेत समीकरणे
“डिविलिअर्सचा गृहपाठ पूर्ण तर, ३ मुलं सापडली अडचणीत”, विराटला आठवले शाळेचे दिवस
ट्रेंडिंग लेख-
चेन्नईचे तारणहार बनण्यास तयार आहेत ४ युवा प्रतिभावान खेळाडू ; मुंबईविरुद्ध मिळणार संधी?
आयपीएल २०२०: पॉवरप्लेमध्ये एका षटकात सर्वाधिक धावा देणारे ३ गोलंदाज
आयपीएलमध्ये पहिले शतक झळकवण्यासाठी सर्वाधिक डाव खेळलेले ३ भारतीय फलंदाज