Sai Sudharsan Records: आयपीएल 2025 मधील एलिमीनेटर सामना मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स संघात खेळला गेला. (GT vs MI) या सामन्यात युवा प्रतिभावान क्रिकेटर साई सुदर्शनने ऐतिहासिक कामगिरी करत आपले नाव आयपीएलच्या दिग्गजांमध्ये नोंदवले आहे. (Sai Sudharsan Record) एकाच हंगामात 700 हून अधिक धावा करणारा सुदर्शन इतिहासातील केवळ 9 वा खेळाडू ठरला आहे. (Sai Sudharsan 700 Runs) मुंबई इंडियन्सविरुद्धच्या एलिमिनेटर सामन्यात त्याने ही ऐतिहासिक कामगिरी केली आहे. (IPL Records) तो आयपीएल 2025 मध्ये 700 धावांचा टप्पा गाठणारा पहिला खेळाडू बनला आहे, त्यामुळे ऑरेंज कॅप (Orange Cap) देखील सध्या त्याच्याच डोक्यावर आहे.
मुंबई इंडियन्सविरुद्धच्या एलिमिनेटर सामन्यापूर्वी सुदर्शनने 14 सामन्यांमध्ये 679 धावा केल्या होत्या. मुंबईविरुद्धच्या सामन्यात 21 धावा करताच त्याने 700 धावांचा टप्पा पार केला आहे. त्याच्यापूर्वी विराट कोहली आणि शुबमन गिल हेच असे 2 भारतीय फलंदाज आहेत, ज्यांनी एका आयपीएल हंगामात 700 किंवा त्याहून अधिक धावा केल्या आहेत. (IPL Records)
एका आयपीएल हंगामात 700+ धावा करणारे खेळाडू
विराट कोहली – 973 धावा (2016)
शुबमन गिल – 690 धावा (2023)
जोस बटलर – 853 धावा (2022)
डेविड वॉर्नर – 848 धावा (2016)
विराट कोहली – 741 धावा (2024)
केन विल्यम्सन – 735 धावा (2018)
ख्रिस गेल – 733 धावा (2012)
मायकल हसी – 733 धावा (2013)
फॅफ डु प्लेसिस – 730 धावा (2023)
ख्रिस गेल – 708 धावा (2013)
Sai Sudharsan is ON FIRE!????
— CricketGully (@thecricketgully) May 30, 2025
700 runs & counting in #IPL2025 ???????????? pic.twitter.com/lqFJcTmQWA






