भारतीय देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात मोठी स्पर्धा असलेल्या रणजीचा उत्साह कायम आहे. एलिट टप्प्यातील दुसऱ्या फेरीच्या सामन्यांना आज (18 ऑक्टोबर) शुक्रवारपासून सुरुवात झाली. जिथे पहिल्याच दिवशी अनेक खेळाडूंनी जबरदस्त कामगिरी दाखवली. पहिल्या दिवसाच्या खेळात झारखंडचा यष्टिरक्षक फलंदाज आणि कर्णधार ईशान किशनने उत्कृष्ट शतक झळकावले. तर तामिळनाडूचा युवा फलंदाज साई सुदर्शननेही दमदार कामगिरी करत द्विशतक झळकावले.
एलिट स्टेज सामन्यात झारखंडचा कर्णधार ईशान किशनने रेल्वेविरुद्ध 101 धावांची शानदार खेळी केली. तर तामिळनाडूचा युवा फलंदाज साई सुदर्शनने दिल्लीविरुद्ध चमकदार कामगिरी करत द्विशतक झळकावले. तसेच तो 202 धावांवर नाबाद आहे. हे दोन्ही युवा फलंदाज टीम इंडियाकडून खेळण्याची वाट पाहत आहेत. अशा परिस्थितीत या कामगिरीने साईने टीम इंडियाचे दार ठोठावले असून ईशान किशननेही पुनरागमनाचा दावा केला आहे.
अनेक दिवसांपासून टीम इंडियापासून दूर असलेला प्रतिभावान यष्टीरक्षक फलंदाज ईशान किशन या रणजी मोसमात झारखंडचे कर्णधारपद सांभाळत आहे. अहमदाबादमध्ये एलिट स्टेजच्या ग्रुप-‘डी’ मध्ये झारखंड आणि रेल्वे यांच्यात सामना खेळला जात आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशी झारखंडने दिवसाचा खेळ संपेपर्यंत 5 गड्यांच्या मोबदल्यात 325 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये कर्णधार ईशान किशनने 158 चेंडूत 13 चौकार आणि 2 षटकारांसह 101 धावांची खेळी केली. तर विराट सिंगनेही 187 चेंडूत 8 चौकार आणि 2 षटकार लगावत 103 धावा केल्या.
– Hundred in Buchi Babu tournament.
– Hundred in Duleep Trophy.
– Hundred in Ranji Trophy.ISHAN KISHAN is making a strong statement ahead of the India A selection for the Australia tour. 🇮🇳 pic.twitter.com/OkyK65Tavd
— Johns. (@CricCrazyJohns) October 18, 2024
दुसरीकडे, एलिट ग्रुप-डीच्या अन्य सामन्यात तामिळनाडू आणि दिल्ली यांच्यात सामना होत आहे. दिल्लीत खेळल्या जात असलेल्या या सामन्याच्या पहिल्या दिवशी तामिळनाडूच्या फलंदाजांची कामगिरी पाहायला मिळाली. साई सुदर्शनने संघासाठी शानदार फलंदाजी करत पहिल्या दिवशी द्विशतक झळकावले. दिवसाचा खेळ संपेपर्यंत तो 259 चेंडूंत 23 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 2020 धावांवर उभा आहे. तर वॉशिंग्टन सुंदर 96 धावांवर त्याला साथ देत आहे. दिवसाचा खेळ संपेपर्यंत तामिळनाडूने 1 बाद 379 धावा केल्या आहेत.
🚨 DOUBLE HUNDRED FOR SAI SUDHARSAN 🚨
– Double Hundred against Delhi in Ranji Trophy, Sai is making a huge statement in domestic cricket, The future star of India. pic.twitter.com/R8riHSIQLT
— Johns. (@CricCrazyJohns) October 18, 2024
हेही वाचा-
विराट कोहलीची शेवटच्या चेंडूवर मोठी चूक, रिव्ह्यू घेऊनही ठरला बाद!
टीम इंडियासाठी आनंदाची बातमी! रिषभ पंतच्या दुखापतीबाबत मोठे अपडेट समोर
ind vs nz; भारताचा पलटवार, रोहित-विराटसह, सर्फराजची शानदार खेळी, असा राहिला तिसरा दिवस