टोकियो ऑलिम्पिक २०२० मध्ये स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने कांस्य पदक जिंकले आहे. या कांस्य पदकासह सिंधूने भारतासाठी दुसरे पदक जिंकले आहे. सिंधूला पदक जिंकल्याबद्दल देशभरातून अभिनंदन आणि शुभेच्छा मिळत आहेत. पण भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवालने अजून ही तिचे अभिनंदन केले नाही. सायनाने महिला हॉकी संघ विजयी झाल्याबद्दल ट्विट करून त्यांचे अभिनंदन केले, पण सिंधूसाठी एकही ट्विट तिने केले नाही.
कांस्य पदक जिंकल्यानंतर पत्रकार परिषदेत सिंधूने सांगितले की, पदक जिंकल्यानंतर मुख्य राष्ट्रीय प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांनी तिचे अभिनंदन केले होते. पण तिला वरिष्ठ खेळाडू सायना नेहवालकडून अजून ही अभिनंदन केल्याचा एकही संदेश आला नाही.
पदक जिंकल्यानंतर गोपीचंद आणि सायना तिच्याशी बोलले का, असे विचारल्यावर सिंधू आभासी पत्रकार परिषदेत म्हणाली की, “नक्कीच गोपी सरांनी माझे अभिनंदन केले आहे. मी अजून सोशल मीडिया पाहिला नाही. मी हळूहळू प्रत्येकाला उत्तर देत आहे. सिंधू म्हणाली, गोपी सरांनी मला संदेश रूपात अभिनंदन केले. परंतु, सायनाने अजून ही माझे अभिनंदन केले नाही.”
सायना नेहवाल आणि पीव्ही सिंधू यांच्यात कोणताही संवाद सध्या होत नाही. सिंधूने स्वतःहा याबाबत खुलासा केला आहे. पत्रकार परिषदेत सिंधू म्हणाली की, आम्ही जास्त बोलत नाही.
सिंधू गेल्या वर्षी कोरोना महामारी दरम्यान तीन महिन्यांच्या प्रशिक्षणासाठी लंडनला गेली होती. त्यानंतर तिच्या आणि गोपीचंद यांच्यात मतभेद झाल्याच्या बातम्या पसरत होत्या. घरी परतल्यानंतर ही सिंधूने गोपीचंद अकादमीऐवजी पार्क ताई-संग यांच्या मार्गदर्शनाखाली गाचीबौली इनडोअर स्टेडियमवर प्रशिक्षण घेण्याचा निर्णय घेतला होता.
ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी पहिली भारतीय महिला पीव्ही सिंधू बनलेली आहे. त्याचदरम्यान ती म्हणाली की, “उपांत्य फेरी गमावल्यानंतर मी निराश झाली होती. पण प्रशिक्षक पार्क ताई-साँगने मला प्रेरणा दिली की, तुला अजून खूप खेळायचा आहे. तुझा खेळ इथेच संपलेला नाही. तू चौथ्या क्रमांकावर जाणे चांगले आहे. कांस्यपदक जिंकल्यानंतर घरी जायचं आहे. प्रशिक्षकाच्या शब्दांनी मला प्रेरणा मिळाली आणि मी माझे सर्व लक्ष कांस्यपदकाच्या लढतीवर केंद्रित केले. सामना जिंकल्यानंतर मी पाच ते दहा सेकंदांसाठी सर्व काही विसरले होते”
सिंधूला महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत चायनीज तैपेईच्या ताई त्झू यिंगकडून १८-२१, १२-२१ असे पराभूत व्हावे लागले होते. परंतु कांस्यपदकाच्या सामन्यामध्ये चीनच्या बिंग जिओला सरळ सेटमध्ये पराभूत करत सिंधूने यश मिळवले.
महत्त्वाच्या बातम्या –
क्रिकेटसाठी सोडला भारत, अमेरिकेच्या संघाचा बनला कर्णधार; आता पहिल्याच सामन्यात चोपल्या नाबाद ९९ धावा
क्रिकेटप्रेमींसाठी खुशखबर! लवकरच सुरू होतेय आयपीएलसारखी मोठी टी२० टूर्नामेंट, जाणून घ्या त्याबद्दल
अरे व्वा! कांस्य पदक जिंकताच पीव्ही सिंधूवर पडतोय बक्षीसांचा पाऊस; आयओए देणार ‘इतके’ लाख रुपये