भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवालने भारताला अनेक मोठे विजय मिळवून दिले आहेत. पण आता ती लवकरच राजकारणाच प्रवेश करण्याची शक्यता आहे. ती आज भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.
हरियाणामध्ये जन्म झालेल्या सायनाने ऑलिंपिक तसेच राष्ट्रकुल स्पर्धेत पदके मिळवली आहेत. तिने 2012 च्या ऑलिंपिकमध्ये कांस्यपदक जिंकले होते.
तसेच 2015 मध्ये सायना जागतिक बॅडमिंटन क्रमवारीत अव्वल क्रमांकावरही विराजमान झाली होती. त्यावेळी अव्वल क्रमांकावर पोहचणारी ती पहिली भारतीय महिला बॅडमिंटनपटू ठरली होती. तसेच सायनाने आंतरराष्ट्रीय स्तरावर 24 विजेतीपदे मिळवली आहेत. ती सध्या जागतिक बॅडमिंटन क्रमवारीत 18 व्या क्रमांकावर आहे.
29 वर्षीय सायनाच्या आधी भारताचा कुस्तीपटू योगेश्वर दत्त, बबीता फोगाट आणि क्रिकेटपटू गौतम गंभीर हे देखील भाजप पक्षात सामील झाले आहेत.
तिसऱ्या टी२० सामन्यासाठी हे आहेत भारताचे ११ शिलेदार
वाचा👉https://t.co/dJXEyxQrTw👈#म #मराठी #Cricket #NZvIND #TeamIndia— Maha Sports (@Maha_Sports) January 29, 2020
जगात कोणत्याच संघाला जमली नाही अशी कामगिरी केली १९ वर्षांखालील टीम इंडियाने
वाचा👉https://t.co/ntCSnnXFVd👈#INDvAUS #U19CWC #TeamIndia #म #मराठी— Maha Sports (@Maha_Sports) January 29, 2020