---Advertisement---

पदार्पणात त्रिशतक ठोकणाऱ्या बिहारच्या पठ्ठ्याचा आणखी एक धमाका; फक्त चौकारांच्याच मदतीने ठोकल्या ‘इतक्या’ धावा

On: शुक्रवार, फेब्रुवारी 25, 2022 6:22 PM
Sakibul-Gani
---Advertisement---

बिहारचा खेळाडू साकिबुल गनीने (Sakibul Gani) रणजी करंडक स्पर्धेतील (Ranji Trophy) आपल्या पहिल्या सामन्यातील उत्कृष्ट कामगिरीनंतर पुढील सामन्यांत देखील आपली खेळी कायम ठेवली आहे. २२ वर्षीय गनीने आपल्या पदार्पणाच्या सामन्यात त्रिशतक झळकावत इतिहास रचला होता. त्याने दुसऱ्या सामन्यात बिहार संघाकडून खेळताना सिक्कीमविरुद्ध (Bihar vs Sikkim) १३५ चेंडूत ९८ धावा केल्या आहेत. यामध्ये १८ चौकारांचा समावेश आहे. त्याने चौकार मारूनच ७२ धावा केल्या आहेत. तो मिझोरमविरुद्ध ३४१ धावा करणारा पहिला खेळाडू ठरला आहे.

कोलकाता येथील ईडन गार्डन्स मैदानावर शुक्रवारी (२५ फेब्रुवारी) साकिबुलच्या या दमदार खेळीच्या जोरावर बिहार संघाला सामन्याच्या पहिल्या दिवशी ३०० धावांचा टप्पा गाठता आला. लखन राजासोबत साकिबुलने चौथ्या विकेटसाठी ५७ धावांची भागीदारी केली आणि बिपीन सौरभसोबत ५व्या विकेटसाठी १०० धावांची भागीदारी केली. बिहारच्या पहिल्या डावात १२६ चेंडूत ७३ धावा करून बिपुल कुमार बाद झाला.

https://twitter.com/yadavtejashwi/status/1494732672874123267

पहिल्याच सामन्यात ३८७ चेंडूत ३४१ धावा करून साकिबुल बाद झाला. प्रथम श्रेणी पदार्पणात सर्वात मोठी खेळी खेळण्याचा विक्रम मध्य प्रदेशचा फलंदाज अजय रोहेराच्या नावावर होता, परंतु आता तो गनीच्या नावावर आहे. अजयने २०१८-१९ च्या रणजी हंगामात हैदराबादविरुद्ध २६७ धावा केल्या होत्या.

साकिबुल हा बिहारमधील मोतिहारी येथील रहिवासी आहे. त्याला चार भाऊ आणि तीन बहिणी असून साकिबुल हा सर्वात लहान आहे. साकीबुलने वयाच्या ७व्या वर्षापासून क्रिकेट खेळायला सुरुवात केली. साकिबुलचा मोठा भाऊ फैसल गनीने सांगितले होते की, साकिबुलची महागडी बॅट घेण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नाहीत, पण आईने कधीच पैशाची कमतरता जाणवू दिली नाही. कधी त्रास झाला की, आई दागिने गहाण ठेवून मदत करायची. त्याने या अगोदर २३ वर्षाखालील स्पर्धेत ३०२ धावांची खेळी केली होती. तसेच त्याने यापूर्वी द्विशतक देखील झळकावले आहे. तो उत्कृष्ट गोलंदाजी देखील करतो.

महत्त्वाच्या बातम्या-

संधीचे सोने! तब्बल ९७ सामन्यानंतर कसोटी पदार्पणाची संधी मिळेलेल्या फलंदाजाचा न्यूझीलंडविरुद्ध शतकी तडाखा

द्रविड-गांगुलीसोबतली चर्चा उघड करणे वृद्धिमान सहाला पडणार महागात? बीसीसीआय घेऊ शकते मोठा निर्णय

‘कर्णधार’ रोहित शर्माचा मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून होणार मोठा सन्मान, कारणही आहे खास

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---