भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीने गेल्या वर्षी १५ ऑगस्टला सोशल मीडियाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटला निरोप दिला होता. यानंतर आयपीएलच्या तेराव्या हंगामात तो चेन्नई सुपर किंग्स संघाचे नेतृत्त्व करताना दिसला. आयपीएलच्या तेराव्या हंगामानंतर धोनी आपल्या व्यक्तिगत आयुष्यात फारच व्यस्त झाला आहे. तो आपला पूर्ण वेळ कुटुंब आणि मित्रांसोबत घालवत असतो. सध्या धोनी काही काळासाठी त्याची पत्नी साक्षीच्या मैत्रिणीच्या लग्नासाठी मुंबईला गेला आहे.
यावेळी साक्षी धोनीसोबत मस्ती करताना दिसली. विरल भयानी नामक व्यक्तीने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर धोनी आणि साक्षीचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत साक्षी आपल्या मैत्रींसोबत धमाल करताना दिसत आहे. तिच्यापुढे धोनी एका खुर्चीवर बसला आहे. मागे गाण्याचा आवाज येत असून साक्षीला धोनीसोबत डान्स करण्याची इच्छा असते. परंतु धोनी जागचा हालतदेखील नाही. तरीही ती पुन्हा प्रयत्न करते, परंतु धोनी न उठल्याने ती त्याला चिडवताना दिसत आहे.
याव्यतिरिक्त साक्षीने मैत्रिणीच्या लग्नातील आपले काही फोटोही शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिने गुलाबी रंगाचा ड्रेस परिधान केला असून ती त्यात कमालीची सुंदर दिसत आहे. या फोटोंमध्ये ती भरभरून पोज देत आहे.
https://www.instagram.com/p/CLWGCmaH0dv/?utm_source=ig_web_button_share_sheet
https://www.instagram.com/p/CLWonDsHa5Q/?utm_source=ig_web_button_share_sheet
https://www.instagram.com/p/CLUXufCnIBG/?utm_source=ig_web_button_share_sheet
आयपीएल २०२० नंतर भलेही धोनी क्रिकेट खेळताना दिसला नाही. परंतु आता पुन्हा एकदा तो चौदाव्या पर्वात सहभागी होणार आहे. त्यामुळे त्याला मैदानावर खेळताना पाहण्याची चाहत्यांची ही इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. आयपीएलचा लिलाव लवकरच सुरू होणार असून चेन्नईच्या संघाने लिलावपूर्वी आपल्या संघातून केदार जाधव, हरभजन सिंग सारख्या अनुभवी खेळाडूंना मुक्त केले आहे.
महत्त्वाचे म्हणजे, सन २०२० मध्ये खेळल्या गेलेल्या आयपीएलमध्ये धोनीच्या संघाने खराब कामगिरी केली होती. अशा परिस्थितीत धोनी येत्या चौदाव्या हंगामात प्रेक्षकांची मने जिंकून आपल्या संघाला विजयाच्या दिशेने कसे नेता येईल? हे पाहणे अधिक औत्सुक्याचे ठरेल.
महत्त्वाच्या बातम्या-
‘कर्णधार’ कोहलीची अझरुद्दीनच्या ‘या’ विक्रमाची बरोबरी, आता केवळ एमएस धोनी आहे पुढे
व्हिडिओ: “मैं तुम पर भरोसा कर के एक रन लिया, अब तू…,” चेन्नई कसोटीत अश्विनची सिराजला वॉर्निंग
विराट कोहलीने केली ‘कॅप्टनकूल’ धोनीची बरोबरी, आता स्मिथचा विक्रम निशाण्यावर




