कॉमनवेल्थ गेम्स २०२२च्या आठव्या दिवशी (५ ऑगस्ट), भारताने तीन सुवर्णांसह सहा पदके जिंकून चमकदार कामगिरी केली. विशेष म्हणजे ही सहाही पदके कुस्तीत आली. यादरम्यान महिला कुस्तीपटू साक्षी मलिक हिनेही सुवर्ण जिंकले. साक्षी मलिकने महिलांच्या ६२ किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत कॅनडाच्या अना गोडिनेझ गोन्झालेझचा ४-४ असा पराभव केला.
साक्षीविरुद्धच्या पहिल्या फेरीत ऍना गोन्झालेझने दोन टेक डाउन आणि प्रत्येकी दोन गुणांसह ४-० अशी आघाडी घेतली. अशा स्थितीत साक्षी मलिकच्या हातातून सामना निसटू शकतो, असे वाटत होते. पण २९ वर्षीय साक्षीने उत्तरार्धाच्या सुरुवातीला टेकडाउनमधून दोन गुण घेतले आणि नंतर कॅनडाच्या खेळाडूला पिन केले आणि सर्वोत्तम डाव खेळत सुवर्णपदक जिंकले.
Gold medal 🥇 winner Sakshi Malik gets emotional during the award winning ceremony. So proud of you #SakshiMalik . India’s daughter at the victory podium #CommonwealthGames #wrestling#Cheer4India #BajrangPunia #DeepakPunia pic.twitter.com/UMtf9yfTJr
— Dr_Pavan🇮🇳 (@Pavan_new) August 6, 2022
सुवर्णपदक जिंकल्यानंतर साक्षी मलिकला आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवता आले नाही आणि पोडिओ येथील पदक समारंभात तिच्या डोळ्यात अश्रू आले. राष्ट्रकुल स्पर्धेतील साक्षी मलिकचे हे पहिले सुवर्णपदक आहे. यापूर्वी तिने राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्य आणि कांस्यपदके जिंकली आहेत. साक्षी मलिकने उपांत्यपूर्व फेरीत इंग्लंडच्या केल्सी बार्न्सचा आणि उपांत्य फेरीत कॅमेरूनच्या एटेन एनगोलेचा १०-० असा पराभव करून अंतिम सामन्यात प्रवेश केला होता.
साक्षीचा अप्रतिम प्रवास
साक्षी मलिक यांना कुस्तीचा वारसा मिळाला कारण तिचे आजोबा बदलू राम हे एक प्रसिद्ध कुस्तीपटू होते. वयाच्या १२व्या वर्षी साक्षीने कुस्ती शिकण्यासाठी आखाड्यात जायला सुरुवात केली. साक्षी मलिकने वयाच्या १७व्या वर्षी आशियाई ज्युनियर चॅम्पियनशिपमध्ये भाग घेतला होता. त्यानंतर २००९मध्ये साक्षीने आशियाई ज्युनियर चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदक जिंकून तिचे पहिले आंतरराष्ट्रीय पदक मिळवले. यानंतर २०१०मध्ये वर्ल्ड ज्युनियर चॅम्पियनशिपमध्ये साक्षीने आपली अप्रतिम कामगिरी दाखवत कांस्यपदक जिंकले. नंतर साक्षीने २०१२मध्ये आशियाई ज्युनियर चॅम्पियनशिपचे सुवर्णपदकही जिंकले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘या’ खेळाडूवर रोहित-द्रविडचा अन्याय! टी२० विश्वचषकासाठी दावा ठोकण्याची देत नाहीयेत एकही संधी
विराटला टी२० विश्वचषकातूनही वगळणार! बीसीसीआयच्या मोठ्या अधिकाऱ्याचे खळबळजनक वक्तव्य
बहुप्रतिक्षित भारत-विंडीज चौथ्या टी२० सामन्यात पाऊस मोडता घालणार? वाचा संपूर्ण रिपोर्ट