भारताची ऑलिंपिक पदक विजेती स्टार कुस्तीपटू साक्षी मलिकने नुकतेच बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूच्या ‘द ए-गेम बाय पीव्ही सिंधू’ या मुलाखतीच्या कार्यक्रमात हजेरी लावली होती. या मुलाखतीदरम्यान तिने कुस्ती खेळण्यास का सुरुवात केली, हे देखील सांगितले.
२०१६ च्या रिओ ऑलिंपिकमध्ये कांस्यपदक जिंकणाऱ्या साक्षीने सांगितले की तिचे कुस्तीपटू बनण्यामागचे पहिले लक्ष्य हे विमानात बसणे होते. याच कारणाने तिने कुस्ती खेळण्यासही सुरुवात केली.
साक्षी म्हणाली, ‘मी सुरुवातीला कुस्ती खेळणे यासाठी सुरु केले होते की एक दिवस मला विमानात बसण्याची संधी मिळेल. कारण माझ्या सिनियर्सने मला सांगितले होते की जर तू पहिल्या क्रमांकावर आली तर तुला विमानात बसण्याची संधी मिळेल. हळु हळू मला समजू लागले की राष्ट्रकुल स्पर्धा, आशियाई गेम्स आणि ऑलिंपिक या स्पर्धा कोणत्याही खेळाडूसाठी एक मोठे मंच असते. प्रत्येक ऍथलिटचे स्वप्न असते की त्याला ऑलिंपिकमध्ये पदक जिंकायचे आहे. यानंतर मी दिवस-रात्र मेहनत घेतली.’
On #TheAGame today, @SakshiMalik recalls her historic run at the 2016 Rio Olympics which gave India its first medal in women’s wrestling.✌️
Catch the full episode here: https://t.co/4efbbYql7Z @baselineventure @Visa_IND #DecodingSuccess pic.twitter.com/phLmyIGHRG
— Pvsindhu (@Pvsindhu1) October 24, 2020
साक्षी गेले ९ वर्षापासून कुस्तीमध्ये यशस्वी ठरत आहे. तिने २०१४ मध्ये ग्लास्गो येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदक मिळवले होते. तर २०१६ ला ऑलिंपिकमध्ये पदक जिंकणारी ती पहिली महिला कुस्तीपटू होती. तसेच २०१८ च्या राष्ट्रकुल स्पर्धेत तिला कांस्यपदक मिळाले होते.
सध्या साक्षी समोर २०२१ ला होणाऱ्या टोकीयो ऑलिंपिकसाठी पात्र ठरण्याचे लक्ष्य आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
सात महिन्यांनंतर भारतीय महिला कुस्तीपटूंच्या सरावाला सुरवात
विश्व कुस्ती चॅम्पियनशीपमध्ये ‘या’ देशाचा संघ नाही होणार सहभागी
मनजीत आणि सुशील कुमारची कुस्तीत दोस्ती!