कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे इंडियन प्रीमियर लीग 2021 च्या हंगामाला अर्ध्यातूनच स्थगिती मिळाली होती. त्यानंतर सर्व खेळाडू आपल्या घरी वेळ घालवत होते. परंतु आता भारतीय संघ विश्व कसोटी अजिंक्यपद अंतिम सामना खेळण्यासाठी इंग्लंड दौऱ्यावर गेला आहे. परंतु माजी भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनी सध्या आपल्या घरीच विश्रांती घेत आहे. धोनी आपल्याला सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या उर्वरित आयपीएल सामन्यांमध्ये मैदानावर दिसणार आहे.
भारतीय संघाचा माजी यष्टीरक्षक फलंदाज महेंद्रसिंग धोनी रांचीमध्ये आपल्या फार्म हाऊसवर कुटुंबासोबत वेळ घालवत आहे. धोनी जरी सोशल मीडियावर सक्रिय नसला तरीही त्याची पत्नी साक्षी धोनी ही नेहमी सोशल मीडियावर धोनीचे फोटो-व्हिडिओ शेअर करत असते. शनिवारी (१२ जून) साक्षीने एक व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर पोस्ट केला आहे, ज्यामध्ये धोनी आपल्या घोड्यासोबत पळताना दिसत आहे.
धोनी या व्हिडिओमध्ये काळया रंगाचा टीशर्ट आणि पॅन्टमध्ये पळताना दिसत आहे. त्याच्या बाजूने त्याचा पाळीव घोडाही पळताना दिसत आहे. असे वाटत आहे की, त्या दोघांनी एकमेकांसोबत शर्यत लावलेली आहे. साक्षीने हा व्हिडीओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये लिहिले की ‘मजबूत आणि वेगवान.’ त्याचसोबत तिने हॅशटॅग ‘शेडलेंड पोनी आणि रेसिंग’ असेही लिहिले आहे.
https://www.instagram.com/p/CQBYaUqnx49/?utm_source=ig_web_button_share_sheet
धोनीने काही दिवसांपूर्वीच शेटलैंड पोनी जातीचा घोडा स्कॉटलंडवरून मागविला आहे. जवळजवळ दोन वर्षांचा हा घोडा जगातील सर्वात छोट्या जातींपैकी एक आहे. याची उंची 3 फूट इतकी आहे. हा घोडा त्याच्या वेगवान गतीमुळे नाही, तर त्याच्या सजावटीसाठी ओळखला जातो. याच्या अगोदर धोनीने चेतक नावाचा घोडा खरेदी केला होता. त्याचे वय 1 वर्षे इतके होते.
आयपीएल 2021 चा 14 वा हंगाम कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे स्थगित करण्यात आला आहे. त्यामुळे सध्या धोनी रांचीमध्ये आपला वेळ घालवत आहेत. आयपीएल 2021 चा हंगाम स्थगित होण्यापूर्वी महेंद्रसिंग धोनीच्या संघ चेन्नई सुपर किंगने 7 सामन्यांपैकी 5 सामन्यांमध्ये विजय मिळवला होता. त्यांनी गुणतालिकेच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर स्थान मिळवले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
व्वा रे ‘किंग कोहली’! WTC फायनलपुर्वी गोलंदाजीत आजमावला हात, अनुभवी फलंदाजालाही टाकले संकटात
अरेरे! सचिन-सेहवागला फिरकीच्या तालावर नाचवणारा गोलंदाज, आता बनलाय ‘टॅक्सी चालक’
‘नेट गोलंदाज म्हणून श्रीलंकेला गेल्यास आनंदी असतो,’ चेतन सकारियाचे लक्षवेधी वक्तव्य