---Advertisement---

चुरशीच्या लढतीनंतरही पराभूत झाल्याने सीएसकेच्या ताफ्यात निराशेची लहर, धोनी अन् रैनाची पत्नी तर…

On: मंगळवार, ऑक्टोबर 5, 2021 1:42 PM
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेतील ५० वा सामना दोन बलाढ्य संघांमध्ये पार पडला. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स संघ आमने सामने होते. या दोन्ही संघांनी प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे या दोन्ही संघांमध्ये गुणतालिकेत पहिल्या स्थानी टिकून राहण्यासाठी चुरशीची लढत पाहायला मिळाली. शेवटी दिल्ली कॅपिटल्स संघाने या सामन्यात ३ गडी राखून चेन्नई सुपर किंग्स संघाला पराभूत केले. या पराभवानंतर साक्षी सिंग धोनी आणि प्रियंका रैना यांनी दिलेली रिॲक्शन सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

चेन्नई सुपर किंग्स संघाने या संपूर्ण स्पर्धेत अप्रतिम कामगिरी केली आहे. परंतु या सामन्यात अंबाती रायुडूला वगळता इतर कुठल्याही फलंदाजाला साजेशी कामगिरी करता आली नाही. परिणामी या संघाला ३ गडी राखून पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवानंतर दिल्ली कॅपिटल्स संघाच्या ताफ्यात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले होते. तर चेन्नई सुपर किंग्स संघाच्या ताफ्यात सर्वत्र निराशेची लहर पसरली होती.

हा सामना पाहण्यासाठी सुरेश रैनाची पत्नी प्रियंका रैना आणि एमएस धोनीची पत्नी साक्षी सिंग धोनी देखील स्टेडीयममध्ये उपस्थित होत्या. परंतु आपल्याच संघाला पराभूत होताना पाहून त्या खूप निराश झाल्या होत्या.

या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याच्या निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या चेन्नई सुपर किंग्स संघातील दोन्ही सलामीवीर फलंदाज स्वस्तात माघारी परतले. त्यानंतर रायुडूची ५५ धावांची खेळी वगळली तर इतर कुठल्याही फलंदाजाला साजेशी कामगिरी करता आली नाही. रायुडूने ४३ चेंडूंमध्ये ५ चौकार आणि २ षटकारांचा साहाय्याने ५५ धावांची खेळी केली होती. या खेळीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्स संघाला २० षटक अखेर ५ बाद १३६ धावा करण्यात यश आले होते.

या धावांचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्स संघाकडून शिखर धवन आणि पृथ्वी शॉ यांची जोडी मैदानावर आली होती. या दोघांना देखील चांगली सुरुवात करून देण्यात अपयश आले होते. शिखर धवनने या डावात ३९ तर पृथ्वी शॉ ने १८ धावांचे योगदान दिले होते. निर्णायक क्षणी शिमरोन हेटमायरने येऊन १८ चेंडूंमध्ये २ चौकार आणि १ षटकाराच्या सहाय्याने २८ धावांची खेळी केली आणि शेवटच्या षटकात दिल्ली कॅपिटल्स संघाला ३ गडी राखून विजय मिळवून दिला.

महत्त्वाच्या बातम्या-

शिष्याच्या हातून पराभूत झाल्यानंतर गुरू धोनीचे अनोखे कारण; म्हणाला, ‘उंच काठीच्या गोलंदाजांमुळे आम्ही…’

चेन्नईविरुद्ध आयपीएल अध्यायाची सुरुवात करणारा रिपल पटेल आहे तरी कोण? ‘अशी’ राहिलीय कारकिर्द

“खूप शांती आहे आज”, तब्बल ५ महिन्यांनी विराट कोहलीचे पंजाब किंग्जला जोरदार प्रत्युत्तर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---