---Advertisement---

रविंद्र जडेजाची तुफान फटकेबाजी पाहून धोनीची पत्नी अवाक्; म्हणाली, ‘हा तर जंगली अवतार’

On: सोमवार, एप्रिल 26, 2021 8:08 AM
---Advertisement---

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रविवारी (२५ एप्रिल) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज या बलाढ्य संघांमध्ये रंगतदार सामना पाहायला मिळाला. या सामन्यात चेन्नई संघाने बेंगलोर संघाला ६९ धावांनी पराभूत केले होते. या विजयासोबतच चेन्नई संघ गुणतालिकेत पहिल्या स्थानी विराजमान झाला आहे. तसेच शेवटच्या षटकांमध्ये येऊन तुफान फटकेबाजी करणाऱ्या रवींद्र जडेजाचे सर्वत्रच कौतुक केले जात आहे. अशातच चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीची पत्नी साक्षी सिंग धोनीनेही जडेजाच्या षटकारांच्या आतिषबाजीवर प्रतिक्रिया दिली आहे.

या सामन्यात चेन्नईचा अष्टपैलू जडेजाने तुफान फटकेबाजी करत २८ चेंडूत ५ षटकार आणि ४ चौकार मारत नाबाद ६२ धावांची खेळी केली. सोबतच गोलंदाजी करताना संघाला ३ गडी देखील बाद करून दिले होते.

त्यातही हर्षल पटेलने टाकलेल्या शेवटच्या षटकात त्याने तब्बल ३७ धावा कुटल्या होत्या. यादरम्यान त्याने ५ षटकार आणि ४ चौकार मारला होता. या खेळीमुळे सामना पूर्णपणे चेन्नई संघाच्या दिशेने वळला होता. त्याच्या शानदार फटकेबाजीला पाहून धोनीची पत्नी साक्षीने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक स्टोरी शेअर केली, ज्यामध्ये तिने जडेजाचे कौतुक करताना ‘बिस्ट मोड’ म्हणजेच जंगली अवतार असे लिहिले आहे.

Photo Courtesy: Instagram/@sakshisingh_r

जडेजाच्या या प्रशंसनीय खेळीनंतर सर्वच स्तरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. अशातच माजी इंग्लिश कर्णधार माइकल वॉनने देखील ट्विट करत जडेजाला पुन्हा ए प्लस करार मिळावा याबाबत वक्तव्य केले आहे. याच खेळीच्या जोरावर त्याला सामनावीर पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते.

तसेच प्रतिस्पर्धी बेंगलोरचा कर्णधार विराट कोहली जडेजाच्या कामगिरीबाबत म्हणाला की, “जडेजाने अशाप्रकारचे प्रदर्शन करणे फक्त चेन्नई सुपर किंग्ज संघासाठीच नव्हे तर भारतीय संघासाठी देखील चांगली बाब आहे. जडेजाला फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात दमदार कामगिरी करताना पाहून खूप चांगले वाटले. दोन महिन्यांनंतर तो भारतीय संघाकडून क्रिकेट खेळणार आहे आणि तुमच्या प्रमुख अष्टपैलू खेळाडूला शानदार फलंदाजी करताना पाहून आनंद तर होणारच.”

जडेजाला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर दुखापत झाल्यामुळे माघार घ्यावी लागली होती. तो भारत-इंग्लंड मालिकेचाही भाग नव्हता. परंतु आता त्याने आयपीएलद्वारे जोरदार पुनरागमन केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

SRHचा पदार्पणवीर, ज्याच्या छोटेखानी खेळीमुळे पाहायला मिळाली हंगामातील पहिली सुपर ओव्हर

कधी खेळली गेली होती पहिली सुपर ओव्हर? घ्या जाणून

…आणि क्रिकेटविश्वाला पहिली ‘डबल सुपर ओव्हर’ आयपीएलने दिली

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---