आगामी टी२० विश्वचषकानंतर भारताचा कर्णधार विराट कोहली टी२० संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा देणार आहे. त्याने ही माहिती गुरुवारी (१६ सप्टेंबरला) सोशल मीडियावर एक पत्र पोस्ट करून दिली आहे. त्याच्या या निर्णयानंतर क्रिकेटप्रेमींमध्ये याच विषयाची चर्चा होत आहे. विराटसाठी १७ ऑक्टोंबरपासून सुरू होणारा टी२० विश्वचषक हा पहिला आणि शेवटचा विश्वचषक असेल, ज्यामध्ये भारतीय संघ त्याच्या नेतृत्वात खेळणार आहे.
कोहलीच्या या निर्णयानंतर अनेक दिग्गजांनी त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. यात आता पाकिस्तान क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सलमान बट्ट यांचीही भर पडली आहे. विराटने भारतीय संघाचे कर्णधारपद सोडले तर काही खास फरक पडणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे. तसेच त्यांनी विराट आणि रोहितची तुलना श्रीलंकेच्या माहेला जयवर्धने आणि कुमार संगकारा यांच्याशी केली आहे.
जयवर्धने-संगकाराप्रमाणे आहेत रोहित-कोहली
पाकिस्तानचे माजी कर्णधार सलमान बट्ट यांनी विराट आणि रोहितची तुलना श्रीलंकेचे दिग्गज खेळाडू महिला जयवर्धने आणि कुमार संगकारा यांच्याशी केली आहे. तसेच विराटच्या राजीनाम्याने संघाला काही खास फरक पडणार नसल्याचेही सांगितले आहे.
ते म्हणाले, “कोहलीने भारतीय संघासाठी अप्रतिम प्रदर्शन केले आहे आणि भारताने संघाने त्याचे रिप्लेसमेंट शोधून काढले आहे. अशात कोहलीच्या कर्णधारपद सोडण्याच्या निर्णयामुळे भारताला कही फरक पडणार नाही. हा खूप विचारपूर्वक घेतलेला निर्णय आहे. कोहली आणि विराटची जोडी भारतासाठी अगदी तशीच आहे, जशी श्रीलंकेसाठी जयवर्धने आणि संगकाराची होती.”
नेतृत्व सोडल्यानंतरही एका संघाप्रमाणे काम करतील रोहित आणि कोहली
सलमान बट्टने त्यांच्या यूट्यूब चॅनेलवर सांगितले की, “जेव्हा श्रीलंकेच्या दोन दिग्गजांमध्ये कर्णधारपदाची अदला-बदली झाली होती, तेव्हाही काही फरक पडला नव्हता आणि दोघांनी एकत्र मिळून काम केले होते. त्याचप्रमाणे मला नाही वाटत की, रोहित कर्णधार बनल्यानंतर कोहली आणि त्याच्यामध्ये वाद होतील. ते एका संघाप्रमाणे काम करू शकतात.”
विराट कोहलीचे भारतीय कर्णधाराच्या रूपात कार्य चांगले राहीले आहे. त्याने ४५ आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व केले असून २७ सामन्यांमध्ये भारताला विजय मिळवून दिला आहे. त्याचे खेळलेल्या एकूण सामन्यंपैकी ६५.११ टक्के सामने जिंकले आहेत
रोहित आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधार
विराटच्या कर्णधारपदाच्या राजीनाम्यानंतर रोहितला टी२० संघाच्या कर्णधार रूपात पाहिले जात आहे आणि टी२० विश्वचषकानंतर भारतीय संघाचे नेतृत्व तो सांभाळू शकतो. विराट कोहली भारताच्या सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. तसेच रोहित आयपीएलमधील सर्वाधीक ट्राॅफी जिंकणार एकमेव कर्णधार आहे. आयपीएलमध्ये रोहितच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने पाच वेळा स्पर्धा जिंकली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
आयपीएल २०२१ मध्ये ऑरेंज कॅप जिंकण्यासाठी ‘हे’ ३ खेळाडू आहेत प्रमुख दावेदार, पाहा नावे
‘थाला’चा सराव सत्रात धूमधडाका, ठोकला कडक हेलिकॉप्टर शॉट; मुंबईकरांची वाढली असेल धडधड!