---Advertisement---

‘पीसीबीकडे मैदान बनवण्यासाठी मातीही नाही’, माजी दिग्गजाने साधला रमीझ राजांवर निशाणा

On: मंगळवार, ऑगस्ट 2, 2022 8:09 PM
Ramiz-Raza
---Advertisement---

पाकिस्तानचा माजी कर्णधार सलमान बट्टने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रमीझ राजा यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. पाकिस्तानकडे मैदान बनवण्यासाठी मातीही नाही, असे त्यांनी म्हटले आहे. तुम्ही बाहेरून प्रशिक्षक आणता. तुम्ही बाहेरून खेळपट्टी आणत आहात. पीसीबी चेअरमनही बाहेरून का आणत नाहीत. असे म्हणत बट्टने पीसीबीवरजरदार निशाणा साधला आहे.

ज्युनियर क्रिकेट लीग पाकिस्तानमध्ये सुरू होत असून पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने गेल्या आठवड्यात दक्षिण आफ्रिकेचा इम्रान ताहिर आणि न्यूझीलंडचा कॉलिन मुनरो यांची मार्गदर्शक म्हणून नियुक्ती केली आहे. शिवाय वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार डॅरेन सॅमी आणि पाकिस्तानचे माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी आणि शोएब मलिक यांची लीगमध्ये मार्गदर्शक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर सलमान बटवर कोणतीही जबाबदारी देण्यात आलेली नाही. या कारणावरून त्याने पीसीबीची खरडपट्टी काढली आहे.

रमीझ राजावर सलमानचा हल्ला
त्याच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर सलमान बट यांनी खणखणीतपणे सांगितले की, “पाकिस्तानला स्वत:चा कोणी मार्गदर्शक नाही, ज्याप्रमाणे देशाकडे ग्राऊंड तयार करण्यासाठी “माती” नाही.” ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी पाकिस्तानने ड्रॉप-इन खेळपट्ट्यांचा वापर केल्याच्या संदर्भात ही टिप्पणी होती. तो पुढे म्हणाला की, “पाकिस्तानमध्ये तरुणांना मेंटॉर करू शकेल असा एकही खेळाडू नाही. तिथे कोणीही नाही. आमच्याकडे पाकिस्तानमध्ये विकेट घेण्यासाठी मातीही नाही आणि तुम्ही मेंटर्सबद्दल बोलत आहात. तुम्हाला वेगवेगळ्या देशांतून यावे लागेल. ड्रॉप करा. -खेळपट्ट्यांमध्ये, वेगवेगळ्या देशांची माती, वेगवेगळ्या देशांचे प्रशिक्षक आणि मार्गदर्शक. दुसऱ्या देशातून अध्यक्ष आणा, नाही का? याबद्दल बोलण्यासारखे काही नाही.”

दरम्यान, सल्मान बट्टने याआधीही अनेक वेळा पीसीबी आणि आणि व्यवस्थापनावर प्रश्चचिन्हे उपस्थित केले होते. याशिवाय यावेळी सल्मान बट्टयाला पाकिस्तानी संघाच्या व्यवस्थापनात सहभागी व्हायचे होते. त्याने स्वत: यीबीबत इच्छा व्यक्त केली होती. मात्र, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने त्याला संधी दिली नाही म्हणूनच बहुदा यावेळी सल्मान बट्ट जास्त भडकल्याचे चित्र पाहायला मिळत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या – 

CWG 2022 | भारतीय खेळाडूचा भीषण अपघात, थेट स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर नेण्याची आली वेळ

CWG2022| भारताची पदके वाढणार! ‘या’ दोन खेळाडूंनी केलाय अंतिम फेरीत प्रवेश

तब्बल ८७ हजार प्रेक्षकांपुढे महिला फुलबॉलरने काढला टी-शर्ट, ‘स्पोर्ट्स ब्रा’वरचे सेलिब्रेशन व्हायरल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---