भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना बुधवारी (दि. 18 जानेवारी) हैदराबाद येथे खेळण्यात आला. प्रथम फलंदाजी करत असलेल्या भारतीय संघासाठी सलामीला आलेल्या युवा शुबमन गिल याने द्विशतक साजरे केले. त्यानंतर त्याचे सातत्याने कौतुक होत आहे. आता यामध्ये पाकिस्तानचा माजी कर्णधार सलमान बट याचादेखील समावेश झाला असून, त्याने गिलची तुलना थेट दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडरर याच्याशी केली.
यावर्षी भारतातच होत असलेल्या वनडे विश्वचषकासाठी सलामीचा दावेदार म्हणून गिल प्रयत्न करत आहे. श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत एक शतक व एक अर्धशतक ठोकलेल्या गिलने या सामन्यात एकहाती संघाची धुरा वाहिली. त्याने 145 चेंडूंवर द्विशतक पूर्ण केले. बाद होण्यापूर्वी त्याने 19 चौकार व 9 षटकारांच्या मदतीने 149 चेंडूंवर 208 धावांची खेळी केली. आपल्या केवळ 19 व्या सामन्यातच त्याने हा पराक्रम करून दाखवला.
त्यानंतर बटने आपल्या युट्युब चॅनलवर बोलताना सांगितले की,
“जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यापासून मी त्याचा मोठा चाहता आहे. तो त्याच्या लयीमध्ये खेळताना अत्यंत सुंदर वाटतो. आधी तो 30-35 धावांना मोठ्या खेळीमध्ये बदलत नव्हता. मात्र, आता ती परिस्थिती देखील बदलली आहे. मला त्याच्याकडे पाहून टेनिसपटू रॉजर फेडररची आठवण होते. शानदार कौशल्य आणि टच गेम त्याच्याकडे आहे. तो अशीच मेहनत घेत राहिला तर, भविष्यात तो नक्कीच भारताचा महान क्रिकेटपटू बनेल.”
भारतीय संघात पुनरागमन केल्यानंतर गिलने मागील वर्षापासून सातत्याने चांगली कामगिरी केली आहे. झिम्बाब्वे व वेस्ट इंडिज दौऱ्यावर तो मालिकावीर ठरलेला. त्यानंतर बांगलादेश दौऱ्यावर कसोटीत शतक पूर्ण केले होते. तसेच, श्रीलंकेविरुद्ध देखील त्याची कामगिरी लक्षणीय होती.
(Salman Butt Said Shubman Gill Play Like Roger Federer)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
वाह रे विदर्भ! गुजरातविरूद्ध अवघ्या 73 धावांचा बचाव करत रणजी ट्रॉफीत नोंदवला विक्रमी विजय
ऐतिहासिक! रणजी ट्रॉफीत तब्बल 41 वर्षांनी दिल्लीची मुंबईवर मात, फलंदाजांची हाराकिरी नडली