---Advertisement---

“भारताला हार्दिककडून खूप अपेक्षा, मात्र त्याने…”

On: सोमवार, ऑगस्ट 23, 2021 6:13 PM
hardik-pandya
---Advertisement---

भारतीय संघाचा प्रमुख अष्टपैलू हार्दिक पंड्या सध्या खराब फॉर्ममधून जात आहे. नुकत्याच झालेल्या श्रीलंका दौऱ्यावर त्याला अपेक्षित कामगिरी करता आली नाही. हार्दिक सतत दुखापतग्रस्त देखील असतो. अफाट गुणवत्ता असली तरी, तो अष्टपैलू म्हणून संघाला तितकासा फायदेशीर ठरत नसल्याचा आरोप त्यांच्यावर केला जातो. याच मुद्द्यावर पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने आपली प्रतिक्रिया दिली आहे.

हार्दिकमध्ये अफाट प्रतिभा
पाकिस्तानचा माजी सलामीवीर कर्णधार सलमान बटने नुकतीच हार्दिक पंड्याविषयी प्रतिक्रिया दिली. आपल्या यूट्यूब चॅनलवर बोलताना बट म्हणाला,
“भारतीय संघाला हार्दिककडून खूप अपेक्षा आहेत. फलंदाजी करताना तो प्रतिभाशाली वाटतो. दुखापतग्रस्त होण्यापूर्वी तो चांगल्या वेगाने व उत्कृष्ट गोलंदाजी करत. मला हार्दिक शारीरिकदृष्ट्या थोडासा कमजोर वाटतो. त्यामुळे त्याला सतत दुखापतींनी घेरलेले असते.”

बट पुढे म्हणाला,
“हार्दिकने आपले स्नायू आणखी मजबूत करण्याची गरज आहे. खेळाबाबत बोललो तर, तो आहे त्यापेक्षा खेळात आणखी सुधारणा करू शकतो. त्याच्या गोलंदाजीची शैली देखील चांगली असून, अतिरिक्त वर्कलोडमुळे तो दुखापतग्रस्त होतो. त्याला ते उत्कृष्टरित्या सांभाळता आले पाहिजे.”

हे दिग्गज त्याच्यापेक्षा अधिक तंदुरुस्त होते
बट याने पुढे म्हटले,
“तुम्ही त्याची तुलना कपिल देव व इम्रान खान यांच्याशी केली तर ते, त्याच्यापेक्षा अधिक तंदुरुस्त होते. देव व खान यांची शरीरे हार्दिकपेक्षा जवळपास दुप्पट होती. त्याला शरीराविषयी काही अडचण आहे का? याबाबत फिजीओंंना चांगले माहित असेल.”
सलमान बटने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर सध्या युट्युबवर क्रिकेट समीक्षक म्हणून आपली मते व्यक्त करतो.

दुसरीकडे, हार्दिक पंड्या आगामी आयपीएल व टी२० विश्वचषकात उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी प्रयत्नशील असेल. तसेच तो गोलंदाजी करण्यास तंदुरुस्त असल्यास त्याचा फायदा भारतीय संघाला होईल. आयपीएलमध्ये तो गतविजेत्या मुंबई इंडियन्सचे प्रतिनिधित्व करतो.

महत्त्वाच्या बातम्या-

वेस्ट इंडीज जिंकेल टी२० विश्वचषक, तर हा खेळाडू ठरेल मालिकावीर, दोनवेळच्या विश्वविजेत्या कर्णधाराची भविष्यवाणी

“जर मी रूटच्या जागी असतो, तर मी बेन स्टोक्सला पुन्हा बोलवले असते”, दिग्गज भारतीय क्रिकेटरचा सल्ला

मस्तीखोर पंतने स्वत:ला म्हटले वर्गातील सर्वात ‘सभ्य मुलगा’, अक्षर-ईशांतने दिल्या भन्नाट प्रतिक्रिया

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---