आयपीएलच्या सोळाव्या हंगामाची तयारी सुरू झाली आहे. मार्च-एप्रिल महिन्यात खेळल्या जाणाऱ्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेचा लिलाव देखील डिसंबर महिन्याच्या शेवटी बघायला मिळेल. त्याचबरोबर खेळाडूंच्या संघांतर्गत अदलाबदलीसाठी ट्रेड विंडो आयपीएलने खुली केली, ज्यामुळे आयपीएल संघ परस्पर सामंज्यस्यातून खेळाडूंची अदलाबदल करु शकतात. यंदाच्या आयपाएलमध्ये कोणता खेळाडू मालामाल होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. ज्या आयपीएलमध्ये खेळाडूंवर पैशांचा पाऊस पडतो, त्याच स्पर्धेतून सॅम बिलिंग्स या खेळाडूकडून माघार घेण्यात आली.
सॅम बिलिंग्स (Sam Billings) याने आतापर्यंत 30 आयपीएल सामने खेळले आहेत, ज्यात त्याच्या नावावर 503 धावा आहेत. इंग्लंडसाठी त्याने 3 कसोटी, 25 एकदिवसीय आणि 37 टी20 सामने खेळले आहेत. त्याने त्याचा शेवटचा सामना वेस्ट इंडिज संघाविरुद्ध जानेवारी 2022मध्ये खेळलेला. हल्लीच पार पडलेल्या टी20 विश्वचषक संघात त्याला स्थान देण्यात आले नव्हते. बिलिंग्सने इंग्लिश समर सिझनमध्ये केंट क्रिकेट संघासोबत खेळ सुरू ठेवणार असल्याची घोषणा केली. 31 वर्षीय सॅम बिलिंग्स आतापर्यंत दिल्ली कॅपीटल्स (Delhi Capitals), चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) आणि कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) या संघामध्ये खेळला आहे. बिलिंग्स बरोबरच आणखी काही खेळाडू आहेत जे आयपीएलच्या या हंगामात प्रेक्षकांना बघायला मिळणार नाहीत.
आतापर्यंत आयपीएलचे 15 हंगाम खेळले गेले आहेत. ज्यामध्ये मुंबई इंडियन्स संघाने सर्वाधिक 5 वेळा हा चषक जिंकला आहे. त्यानंतर चेन्नई सुपर किंग्ज संघाने 4 वेळा जेतेपद मिळवले आहे. त्यानंतर कोलकाता नाईट रायडर्स संघाने 2 वेळा हा चषक जिंकला आहे. मागच्या हंगामात नव्याने सामील झालेल्या गुजरात टायटन्स संघाने आपल्या पहिल्याच हंगामात जेतेपद पटकावले होते. या संघाचे नेतृत्व हार्दिक पांड्या याने केले होते. त्यामुळे पांड्याकडेे भारताचा भावी कर्णधार म्हणून पाहिले जाते. पाकिस्तानच्या काही दिग्गजांनी पांड्या भारताचा चांगला कर्णधार होऊ शकतो असे भाकीत केले.(Sam Billings backs out from IPL2023)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
इंग्लंडचा दिग्गज म्हणतोय, ‘रोहित, अश्विन अन् कार्तिकने रिटायर व्हावे’
‘आपणही त्यांच्यासारखा संघ बनवला पाहिजे’, अनिल कुंबळेंचा टीम इंडियाला सल्ला