सध्या आयपीएलची जोरदार तयारी सुरु आहे. आयपीएल 2023चा मिनी लिलाव कोचिन येथे पार पडला. नेहमीप्रमाणेच काही खेळाडूंना अपेक्षापेक्षा जास्त रक्कम मिळवली तर काहींना साधा खरेदीदार देखील मिळाला नाही. या लिलावात देखील असेच चित्र बघायला मिळाले. लिलावात सामील झालेल्या दोन सख्ख्या भावांसाठी ऊनसावलीची परिस्थिती बघायला मिळाली. सॅम करन आणि टॉम करन हे दोन सख्खे भाऊ आयपीएलच्या लिलावात सामील होते.
आयपीएलच्या या मिनी लिलावात सॅम करन (Sam Curran) कोट्याधीश झाला. पंजाब किंग्ज संघाने त्याला तब्बल 18.50 कोटी रुपयांना खरेदी करत आपल्या संघात सामील केले. सॅम करन याने यंदाच्या टी20 विश्वचषात अष्टपैलू कामगिरी करत इंग्लंडला संघाला विश्वविजेता बनवण्यात महत्वाची भुमिका बजावली होती. आयपीएलमध्ये त्याने आधी चेन्नई सुपर किंग्ज संघासाठी मोलाची कामगिरी केली होती. आता तो पंजाब किंग्ज संघाच्या जर्सीमध्ये दिसणार आहे.दुसऱ्या बाजुला त्याचा भाऊ टॉम करन (Tom Curran) याला खरेदीदार न मिळाल्याने अनसोल्ड राहिला. या लिलावात त्याच्यामध्ये कोणत्याही संघाने रस दाखवला नाही. टॉम हा अष्टपैलू खेळाडू आहे. मात्र, तो यावेळी जास्त प्रभाव पाडू शकला नाही.
यंदाच्या आयपीएल मिनी लिलावात बऱ्याच खेळाडूंना खरेदीदार मिळाले नाही. मात्र, असे देखील खेळाडू आहेत जे सरळ कोट्याधीश झाले. सॅम करन याला 18.50 कोटी रुपयांमध्ये पंजाब किंग्ज संघाने विकत घेतले. आयपीएल इतिहासातील तो सर्वात महागडा खेळाडू ठरला. या आधी इंग्लंडला टी20 विश्वचषक जिंकून देणारा कर्णधार बेन स्टोक्स (Ben Stokes) याला चेन्नई सुपर किंग्जने 16.25 कोटी रुपयांमध्ये खरेदी केले. ऑस्ट्रेलियाच्या कॅमेरुन ग्रीन (Cameron Green) याला 17.50 कोटी रुपयांमध्ये मुंबई इंडियन्स संघाने विकत घेतले.
‘इंडिया का त्योहार’ म्हटल्या जाणाऱ्या आयपीएल स्पर्धेचा हा सोलावा हंगाम असणार आहे. आतापर्यंत मुंबई इंडियन्स संघाने ही स्पर्धा सर्वाधिक वेळा जिंकली आहे. त्यानंतर चेन्नई सुपर किंग्जनेे चारवेळा हा चषक जिंकला. यंदाचा आयपीेल चषक कोणत्या संघाच्या झोळीत जाणार हे पाहण्यासारखा असेल. रॉयल चॅलेंजर बंगलोर अजूनही त्यांचा पहिला वहिला चषक मिळवण्याची वाट बघत आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
हे बरं नाही! चूक स्वत:ची अन् राग दुसऱ्यावर, विराटचा पंतवर आगपाखड करणारा व्हिडिओ पाहाच
IPL AUCTION: तडाखेबंद फलंदाज आणि मिस्ट्री स्पिनर! काश्मीरचा ‘फुल पॅकेज’ विवरांत बनला करोडपती