---Advertisement---

न भूतो! 18 कोटी 50 लाखांची बोली मिळवून सॅम करनने घडवला इतिहास; या संघाचा झाला भाग

On: शुक्रवार, डिसेंबर 23, 2022 3:40 PM
---Advertisement---

आयपीएल 2023 साठीचा मिनी लिलाव कोची येथे झाला. प्रत्येक फ्रॅंचायजी या लिलावात आपल्या संघातील रिकाम्या जागा भरण्याचा प्रयत्न करताना दिसल्या. नुकताच झालेल्या टी20 विश्वचषकात स्पर्धेचा मानकरी ठरलेला इंग्लंडचा अष्टपैलू सॅम करन याने या लिलावात इतिहास रचला. पंजाब किंग्सने तब्बल 18 कोटी 50 लाखांची ऐतिहासिक बोली लावत त्याला आपल्या संघात सामील करून घेतले.  त्यामुळे तो पुन्हा एकदा पंजाबच्या जर्सीमध्ये दिसून येणार आहे.

विश्वचषकातील शानदार कामगिरीमुळे त्याच्यावर पैशाची बरसात होणार हे जवळपास नक्की मानले जात होते. कोणत्याही टप्प्यात गोलंदाजी तसेच फलंदाजी करण्याची क्षमता असल्याने त्याला या लिलावात मागणी दिसली. राजस्थान रॉयल्स व चेन्नई सुपर किंग्सने त्याच्यासाठी जोरदार लढत दिली. 13 कोटींच्या आसपास दोन्ही संघांनी माघार घेतल्यानंतर पंजाबने त्याला आपल्या संघात घेण्यासाठी शर्थीच प्रयत्न केले. मात्र, अचानक मुंबईने उडी मारत त्याचा लिलाव 16 कोटींच्या पार नेला. मात्र, खर्च करण्यासाठी अधिक रक्कम असल्याने पंजाबने अखेरीस 18.50 लाखांची ऐतिहासिक बोली त्याच्यावर लावली.

सॅम करन याला आयपीएल खेळण्याचा पुरेसा अनुभव आहे. 2019 मध्येही तो पंजाब संघाचाच भाग होता. मात्र, त्यानंतर त्याने दोन वर्ष चेन्नई सुपर किंग्ससाठी शानदार कामगिरी करताना आपली ओळख बनवली. मागील हंगामात त्याने दुखापतीच्या कारणामुळे सहभाग घेतला नव्हता. मात्र, यावेळी विश्वचषक तसेच इंग्लंडसाठी केलेल्या चमकदार कामगिरीचे बक्षीस त्याला या रकमेच्या रूपात मिळाले आहे.

(Sam Curran Received Historic Bid In IPL 2023 Auction By Punjab Kings)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
तोटा झाला रे! आयपीएल 2023च्या लिलावात रहाणेला 50 लाखांचा फटका, चेन्नईने घेतलं फक्त ‘एवढ्या’ लाखात
मोठी बातमी! दीड कोटींचा नवखा इंग्लिशमन 13.25 कोटीत हैदराबादच्या चमूत; वाचा कोण आहे तो

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---