---Advertisement---

फायनल सम्राट! इरफानचा 15 वर्ष जुना विक्रम मोडत करनने रचला इतिहास

On: रविवार, नोव्हेंबर 13, 2022 4:17 PM
sam curran
---Advertisement---

ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी20 विश्वचषकाचा अंतिम सामना इंग्लंड आणि पाकिस्तान (ENGvPAK) यांच्या दरम्यान खेळला गेला. मेलबर्न येथील मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर झालेल्या या सामन्यात इंग्लडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. इंग्लंडने आपला गोलंदाजीचा निर्णय योग्य ठरवत पाकिस्तानला निर्धारित 20 षटकात 8 बाद 137 धावांवर रोखले. इंग्लंडच्या गोलंदाजीचे नेतृत्व या सामन्यात अष्टपैलू सॅम करनने केले. त्याने या सामन्यात तीन बळी मिळवताना भारताचा माजी अष्टपैलू इरफान पठाण याचा विक्रम मोडीत काढला.

नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करताना इंग्लंडच्या सर्वच गोलंदाजांनी उत्कृष्ट गोलंदाजीचे प्रदर्शन केले. या विश्वचषकात सर्वाधिक बळी घेणाऱ्या सॅम करनने अंतिम सामन्यातही तशीच कामगिरी करून दाखवली. अत्यंत दबावाच्या या सामन्यात त्याने 4 षटके गोलंदाजी करताना एका निर्धाव षटकासह केवळ बारा धावा देत तीन महत्त्वाच्या फलंदाजांना बाद केले.‌ त्याने या गोलंदाजी आकड्यांसह पहिल्या टी20 विश्वचषकाच्या व‌ मागील विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात केलेल्या सर्वोत्तम गोलंदाजी आकड्यांचा विक्रम मोडीत काढला.

दक्षिण आफ्रिकेत झालेल्या पहिल्या टी20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात इरफान पठाण याने 16 धावा देऊन पाकिस्तानच्या तीन फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवलेला. तर, 2021 टी20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या जोस हेजलवूडनेही न्यूझीलंडच्या 3 फलंदाजांना बाद करताना 16 धावा दिलेल्या.

करनच्या या स्पर्धेतील कामगिरीचा विचार केल्यास तो सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला आहे. त्याने या स्पर्धेत 6 सामने खेळताना 13 बळी आपल्या नावावर केले. तसेच इंग्लंडसाठी टी20 विश्वचषक इतिहासातही एका स्पर्धेत सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज होण्याचे कामगिरी त्याने केले.

(Sam Curran Registered Best Bowling Figures In T20 World Cup Final)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
विश्वचषकाचा संघ कसा जाहीर करावा हे उरुग्वेकडून शिका, व्हिडिओ व्हायरल
नेपाळही भूषवणार अंडर 19 विश्वचषकाचे यजमानपद! या देशात ‘यंग इंडिया’ राखणार आपले विश्वविजेतेपद

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---