पुणे: संभलपूर विद्यापीठ संघाच्या खेळाडूंनी अफलातून खेळ करीत गत उपविजेत्या बेंगलोर सिटी विद्यापीठ संघाचा पराभव करून एसएनबीपी २८ व्या नेहरू अखिल भारतीय आंतरविद्यापीठ हॉकी स्पर्धेत खळबळ उडवून दिली. दुसरीकडे कुरूक्षेत्र विद्यापीठ संघाच्या खेळाडूंनी पारूल विद्यापीठविरुद्ध तब्बल १६ गोल केले.
असोसिएशन ऑफ इंडियन युर्निर्व्हसिटीजच्या मान्यतेने व मुख्य प्रायोजक असलेल्या एसएनबीपी ग्रुप ऑफ इस्टिट्युटच्यावतीने पिंपरी येथिल मेजर ध्यानचंद हॉकी पॉलीग्रास स्टेडियमच्या मैदानावर सुरू झालेल्या या स्पर्धेत संभलपूर विद्यापीठ, गुरू नानक देव विद्यापीठ, कुरूक्षेत्र विद्यापीठ व व्हिबीएसपी विद्यापीठ जौनपूर संघांनी आपआपल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव केला.
संभलपूर विद्यापीठ संघाने गत उपविजेत्या बेंगलोर सिटी विद्यापीठ संघाचा ३-२ गोलने पराभूव केला. त्यांच्या शक्ती कुंजूरने ९ व्या मिनिटाला पहिला गोल करून आपल्या संघाला आघाडी दिली. त्यांनतर त्यांच्या नितेशने लगेच १२ व्या मिनिटाला संघासाठी दुसरा गोल केला. ३१ व्या मिनिटाला बेंगलोर सिटी विद्यापीठ संघाच्या भरथ एमएच मिळालेल्या संधीचा फायदा घेत आपल्या संघाचा पहिला गोल केला. त्यानंतर ३९ व्या मिनिटाला बेंगलोर सिटी संघाच्या प्रणाम गौडाला डी मध्ये मिळालेल्या पासचा त्यांने चेंडूला योग्य दिशा देत संघाचा दुसरा गोल करून बरोबरी साधली. त्या नंतर दोन्ही संघांच्या आघाडीच्या फळीने एकमेकांविरूध्द गोल करण्याचे प्रयत्न केला. पण त्यांना यश येत नव्हते. ५७ व्या मिनिटाला संभलपूर संघाच्या आघाडीच्या फळीने रचलेल्या एका अफलातून चालीने बेंगलोर सिटी संघाच्या बचाव फळीला भेदले आणि संभलपूरच्या बिकाश लाक्राने कोणतीही चूक न करता चेंडू बंगलोर सिटीच्या गोल मध्ये टाकला.
ब गटाच्या दुसऱ्या लढतीत कुरूक्षेत्र विद्यापीठ संघाच्या खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदशन करून पारूल विद्यापीठ, वडोदरा संघाचा १६- ३ गोलने धुव्वा उडविला. कुरूक्षेत्र विद्यापीठ संघाकडून राहूल कुमार ६ व्या, १४ व्या, ३६ व्या, ३७ व्या, ४१ व्या, ५६ व्या मिनिटाला असे सहा गोल केले. त्यांच्या मोखराम ११, २३, २६, व ६० व्या मिनिटाला असे चार गोल केले. त्यांच्या आग्यपालने ८ व्या, इक्नोरदिप सिंग १० व्या, कोहिनूरप्रीत सिंग १६ व्या, सचिन ३२ व्या, विशाल ४५ व्या व रूद्रप्रताक बक्षी ४५ व्या मिनिटाला प्रत्येकी एक गोल केला. पराभूत पारूल विद्यापीठ, वडोदरा संघाकडून रूचित पटेल १३ व्या व ४५ व्या मिनिटाला असे दोन आणि युवराज सिसोदियाने ५९ व्या मिनिटाला एक गोल केला.
गटामध्ये व्हिबीएसपी विद्यापीठ जौनपूर आणि मनोमन्यम सुंदरनार विद्यापीठ, तिरूनलवेली यांच्या झालेली लढत ३-३ गोल बरोबरी संपली. व्हिबीएसपी विद्यापीठ संगाकडून विजेंद्र सिंग ८ व्या व ५५ व्या मिनिटाला असे दोन तर मनिष सहानी १५ व्या मिनिटाला एक गोल केला. मनोमन्यूम सुंदरनार विद्यापीठ संघाकडून आरविंद व्हि.ने ३६ व्या, सुंदरा पांडी ए. ने ३७ व्या व अरविंद कुमार एस.ने ५३ व्या मिनिटाला प्रत्यकी एक गोल केला.
अ गटातील दुसºया सामन्यात गुरू नानक देव विद्यापीठ संघाने एलएनआयईपी, ग्वालिअर संघाला ५-० गोलने नमविले. विजयी संघाकडून दिलप्रीत सिंगने १० व्या, रमणदिप सिंगने १५ व्या व ३५ व्या, संजय कुमारने १९ व्या, सुदर्शन सिंगने ५७ व्या मिनिटाला गाल केले.
निकाल (साखळी फेरी):
गट अ : व्हिबीएसपी विद्यापीठ जौनपूर : ३ गोल (विजेंद्र सिंग ८ व्या ५५ व्या मि., मनिष सहानी १५ व्या मि.) बरोबरी वि. मनोमन्यूम सुंदरनार विद्यापीठ, तिरूनलवेली : ३ गोल (आरविंद व्हि. ३६ व्या मि. सुंदरा पांडी ए. ३७ व्या मि. अरविंद कुमार एस. ५३ व्या मि.)
गट अ : गुरू नानक देव विद्यापीठ, अमृतसर : ५ गोल (दिलप्रीत सिंग १० व्या मि., रमणदिप सिंंग १५ व्या व ३५ व्या मि., संजय कुमार १९ व्या मि., सुदर्शन सिंग ५७ व्या मि.) वि. वि. एलएनआयईपी, ग्वालिअर : ० गोल).
गट ब : कुरूक्षेत्र विद्यापीठ, कुरूक्षेत्र : १६ गोल (राहूल कुमार ६व्या, १४व्या, ३६ व्या, ३७ व्या, ४१ व्या, ५६ व्या मि., आग्यपाल ८ व्या मि.,, इक्नोरदिप सिंग १० व्या मि., मोखराम ११ व्या, २३ व, २६ व्या व ६० व्या मि., कोहिनूरप्रीत सिंग १६ व्या मि., सचिन ३२ व्या मि., विशाल ४५ व्या मि. रूद्रप्रताक बक्षी ४५ व्या मि.) वि. वि. पारूल विद्यापीठ, वडोदरा : ३ गोल (रूचित पटेल १३ व्या व ४५ व्या मि. युवराज सिसोदिया ५९ व्या मि.).
गट ब : संभलपूर विद्यापीठ, संभलपूर : ३ गोल (शक्ती कुंजूर ९ व्या मि., नितेश १२ व्या मि., बिकाश लाक्रा ५७ व्या मि.) वि. वि. बेंगलोर सिटी विद्यापीठ, बंगलुरू : २ गोल (भारथ एमएच ३१ व्या मि., प्रणाम गौडा वायएम ३९ व्या मि.)
महत्त्वाच्या बातम्या-
एसएनबीपी २८वी नेहरू अखिल भारतीय आंतरविद्यापीठ हॉकी स्पर्धा: पहिल्या दिवशी नोंदविले गेले १३ गोल