उत्तर प्रदेश टी20 लीगच्या (UP T20 LEAGUE) 11व्या सामन्यात कानपूर सुपरस्टार्सने नोएडा सुपर किंग्जचा 7 गडी राखून पराभव करत दुसरा विजय नोंदवला. या सामन्यात पहिल्या डावात खेळताना नोएडा सुपर किंग्जने 20 षटकात 119/8 धावा केल्या. प्रत्युत्तरात कानपूर सुपरस्टार्सने 15.2 षटकात 120/3 धावा केल्या. कानपूर सुपरस्टार्सचा शोएब सिद्दीकी (40 चेंडूत 51*) याला सामनावीर म्हणून निवडण्यात आले. कानपूर सुपरस्टार्सचा चार सामन्यांतील हा दुसरा विजय असून गुणतालिकेत संघ 4 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. त्याच वेळी, नोएडा संघ चार सामन्यांत तीन पराभवानंतर 2 गुणांसह शेवटच्या म्हणजे सहाव्या स्थानावर आहे.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या नोएडा सुपर किंग्जची सुरुवात खराब झाली. संघाने एकापाठोपाठ एक विकेट गमावण्यास सुरुवात केली. दोन्ही सलामीवीरांनी अनुक्रमे 9 आणि 6 धावा केल्या. तर कर्णधार नितीश राणाने 11 चेंडूत केवळ 8 धावा केल्या. खालच्या फळीकडून पीयूष चावलाने 17 चेंडूत 19 धावांचे योगदान दिले. मोहम्मद शरीमने 100 हून अधिक धावा करण्यात संघाला सर्वाधिक मदत केली. त्याने 20 चेंडूत 1 चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने 35 धावा केल्या. कानपूर सुपरस्टार्सकडून मोहसीन खान आणि मुकेश कुमार यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.
लक्ष्याचा पाठलाग करताना कानपूर सुपरस्टार्सची सुरुवातही खास नव्हती. आणि मोहम्मद आशियानने 6 चेंडूत 4 धावा करत तूंबत परतला. शोएब सिद्दीकी आणि आदर्श सिंग यांनी अर्धशतकी भागीदारी करत धावसंख्या 80 च्या पुढे नेली. आदर्शने 31 चेंडूत 25 धावांची खेळी खेळली. यानंतर फलंदाजीला आलेल्या कर्णधार समीर रिझवीची स्फोटक शैली पाहायला मिळाली. त्याने 16 चेंडूत तीन चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने 33 धावा केल्या. शोएबने एक टोक सांभाळून शेवटपर्यंत नाबाद राहिला. त्याने 40 चेंडूत 51 धावा करत संघाला विजय मिळवून दिले. नोएडा सुपर किंग्जकडून अजय कुमार, कार्तिकेय यादव आणि नमन तिवारी यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
हेही वाचा-
मोहम्मद आमिरनं 2 वर्षांपूर्वीच सांगितलं होतं शाहीन आफ्रिदीचं भविष्य! खराब कामगिरीनंतर जुना व्हिडिओ व्हायरल
सुरेश रैनाचे एमएस धोनीला विशेष आवाहन; प्रकरण ऋतुराज गायकवाडच्या भविष्याशी संबंधित
घातक बाऊन्सर थेट मानेवरच आदळला, फलंदाजानं लगेच सोडलं मैदान; पाहा नक्की काय घडलं