श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू सनथ जयसुर्या सध्या मोठ्या संकटात सापडला आहे. आयसीसीच्या भ्रष्टाचार विरोधी नियमाअंतर्गत गंभीर आरोप ठेवण्यात आले आहेत. या आरोपाचे उत्तर देण्यासाठी जयसुर्याला आयसीसीने 14 दिवसांची मुदत दिली आहे.
आयसीसीने प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की जयसुर्यावर कलम 2.4.6 च्या अनुसार भ्रष्टाचार विरोधी समीतीला मदत न करण्याचा आणि 2.4.7 च्या अनुसार भ्रष्टाचार विरोधी समीतीच्या कामात व्यत्यय आणण्याचा आरोप केला आहे.
तसेच आयसीसीने याप्रकरणाबद्दल आणखी माहिती दिलेली नाही. तसेच या आरोपांचे उत्तर देण्यासाठी 15 आॅक्टोबरपासून 14 दिवसांचा वेळ देण्यात आला आहे.
जयसुर्याने श्रीलंकेला 1996 चा विश्वचषक जिंकून देण्यात महत्त्वाची जबाबदारी पार पाडली होती. त्यांनी 2011 ला क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला. तसेच 2013 मध्ये ते श्रीलंकेच्या निवड समितीचे अध्यक्ष झाले होते.
मात्र 2015 मध्ये श्रीलंका संघाच्या खराब कामगिरीनंतर त्यांना हे अध्यक्षपद सोडावे लागले होते.
त्यांनी आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत आत्तापर्यंत 110 कसोटी सामन्यात 6973 धावा, 445 वनडे सामन्यात 13430 आणि 31 टी20 सामन्यात 629 धावा केल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या-
–टॉप ५: या खेळाडूंनी मारले आहेत ६ चेंडूत ६ षटकार
–तूम्ही जर अजिंक्य रहाणे- पृथ्वी शाॅचे फॅन असाल तर ही आहे तूमच्यासाठी सर्वात मोठी बातमी
–त्यावेळी आम्ही पृथ्वी शॉच्या १० टक्केही आसपास नव्हतो – विराट कोहली