---Advertisement---

Breaking! दिल्ली कॅपिटल्ससाठी खेळलेला फिरकापटू गजाआड, बलात्काराचे आरोप झाले सिद्ध

On: शुक्रवार, डिसेंबर 29, 2023 9:12 PM
Sandeep Lamichhane
---Advertisement---

नेपाळचा क्रिकेटपटू संदीप लामिछाने याच्यावरील बलात्काराचे आरोप अखेर सिद्ध झाले आहेत. पण न्यायलयाच्या निकालानुसार पीडित मुलगी अल्पवयीन नव्हती. माध्यमांतील वृत्तांनुसार न्यायालयाच्या पुढच्या सुनावणीमध्ये क्रिकेटपटूला शिक्षा सुनावली जाईल. काठमांडू जिल्हा न्यायलयात शुक्रवारी (29 डिसेंबर) ही सुनावणी पार पडली. 

संदीप लामिछाने (Sandeep Lamichhane) नेपाळ क्रिकेट संघाचा माजी कर्णधार राहिला आहे. पीडित मुलीने 6 सप्टेंबर रोजी मेट्रोपॉलिटन पोलीस सर्कल, गौशाला याठिकाणी 22 वर्षीय क्रिकेटपटूविरोधात बलात्काराची तक्रार दाखल केली होती. त्यावेळी संदीप कॅरेबियन प्रीमियर लीग खेळण्यासाठी त्रिनिदाद आणि टोबॅगोमध्ये होता. न्यायधीश शिसिर राज ढकाल यांच्या खंडपीठाने रविवारी याप्रकरणात सुनावणीला सुरुवात केली आणि याच्या शेवटी संदीपला दोषी घोषित करण्यात आले.

दरम्यान, संदीप सध्या जामिनावर बाहेर होता. पटना उच्च न्यायलायच्या आदेशानंतर त्याला तुरुंगातून जामिन मिळाला. यासाठी क्रिकेटपटूला 20 लाख रुपयांचा दंड भरावा लागला होता. काठमांडू जिल्हा न्यायलयाने 4 नोव्हेंबर रोजी संदीपला ताब्यात घेण्याचे आदेश दिले होते. संदीपने मात्र हा आदेशाला आव्हान देण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. काठमांडू जिल्हा मुखत्यार कार्यालयाने 21 ऑगस्ट रोजी लामिछाने विरोधात 17 वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल केला होता. पण शुक्रवारी न्यायलयाच्या निकालानुसार पीडित मुलगी अल्बवयीन नसून तिचे वय 18 वर्ष पूर्ण होते.

संदीपच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीवर एक नजर टाकली, तर त्याने नेपाळसाठी आतापर्यंत 51 वनडे आणि 52 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. वनडे 112, तर टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने आतापर्यंत 98 विकेट्स घेतल्या आहेत.

संदीपच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीवर एक नजर टाकली, तर त्याने नेपाळसाठी आतापर्यंत 51 वनडे आणि 52 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. वनडे 112, तर टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने आतापर्यंत 98 विकेट्स घेतल्या आहेत. संदीप इंडियन प्रीमियर लीगमध्येही खेळला आहे. दिल्ली कॅपटिल्सने आयपीएल 2019 हंगामात नेपाळच्या या युवा खेळाडूला संधी दिली होती. (Sandeep Lamichhane guilty of rape charges)

महत्वाच्या बातम्या –
AUS vs PAK । पॅट कमिन्सचा कसोटी क्रिकेटमध्ये धमाका, महान गोलंदाजांमध्ये बनवले स्वतःचे वेगळे स्थान
विराट अन् रोहितचा ‘हा’ व्हिडिओ करेल पहिल्या कसोटीतील पराभवाच्या वेदना कमी, तुम्ही पाहिला का?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---