---Advertisement---

बलात्कारप्रकरणी दिग्गज क्रिकेटपटू विरोधात अटक वॉरंट! क्रिकेट कारकीर्द धोक्यात

On: मंगळवार, सप्टेंबर 27, 2022 7:54 PM
Sandeep-Lamichhane-Rape-Case
---Advertisement---

नेपाळचा प्रमुख फिरकीपटू व कर्णधार संदीप लामिछाने याच्यापुढील अडचणी कमी होण्याचे नाव घेत नाहीत. मागील महिन्यात एका अल्पवयीन मुलीने त्याच्यावर बलात्काराचे आरोप केले होते. त्याने आपल्यावरील आरोपांचे खंडन केले होते. मात्र, तेव्हापासून तो कोणाचाही संपर्कात नाही. त्यानंतर त्याच्याविरोधात दोन आठवड्यांपूर्वी अटक वॉरंट जारी करण्यात आले होते. आता त्याने स्वतःहून या वॉरंटविषयी प्रतिक्रिया दिली आहे.

संदीपने आपल्या सोशल मीडिया हँडलवरून नेपाली भाषेत एक पोस्ट केली. त्याने लिहिले,
“माझ्याविरुद्ध अटक वॉरंट जारी झाल्याची बातमी पाहिली. या आरोपांमुळे मी निराश आणि आजारी झालो आहे. माझ्यासोबत काय घडतेय याची मला कल्पनाही करवत नाही. या घटनेने मला प्रचंड मानसिक त्रास झाला. तर दुसरीकडे माझी तब्येतही खालावली. मानसिकदृष्ट्या प्रभावित झाल्यामुळे मी स्वत:ला एकांतात ठेवलेय. डॉक्टरांच्या सल्ल्याने मी स्वत:ला सामान्य करण्याचा प्रयत्न करत आहे. माझी प्रकृती हळूहळू सुधारत आहे. खोट्या खटल्याविरुद्ध माझा बचाव करण्यासाठी मी नेपाळला येण्याची योजना आखत आहे.”

सध्या 22 वर्षाच्या असलेला लामिछाने नेपाळचा सर्वात प्रसिद्ध क्रिकेटपटू आहे. जगभरातील टी20 लीगमध्ये खेळणारा तो नेपाळचा एकमेव क्रिकेटपटू आहे. त्याने बिग बॅश लीग, बांगलादेश प्रीमियर लीग, लंका प्रीमियर लीग आणि सीपीएलसह आयपीएलमध्येही भाग देखील आहे. वनडे क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान 50 बळी घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये त्याचा दुसरा क्रमांक लागतो. तर टी20 मध्ये सर्वात वेगवान 50 बळी मिळवणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तो तिसऱ्या क्रमांकावर आहे. ऑगस्ट २०२२ मध्ये केनियाविरुद्धच्या टी20I मालिकेत त्याने अखेरच्या वेळी स्पर्धात्मक क्रिकेट खेळले होते. यानंतर तो सीपीएलमध्ये खेळणार होता. मात्र, सदर आरोप झाल्यानंतर तो स्पर्धेत सहभागी झाला नाही.

अटक वॉरंट जारी झाले तेव्हा लामिछाने नेपाळचा कर्णधार होता. मात्र, त्यानंतर बोर्डाने त्याला निलंबित केले होते. दरम्यान, नेपाळ क्रिकेट असोसिएशनचे कार्यवाहक अध्यक्ष प्रशांत विक्रम मल्ला यांनी चौकशी पूर्ण होईपर्यंत लामिछानेवरील निलंबन कायम राहणार असल्याचे सांगितले आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
न्यूझीलंड ए विरुद्ध संजू सॅमसनची ‘कॅप्टन्स इनिंग’;तिलक, शार्दुलचीही चमकदार फलंदाजी
अर्जुन तेंडुलकरचा युवराज सिंगच्या वडीलांसोबत भांगडा डान्स, व्हिडीओ व्हायरल
असा भारतीय क्रिकेटर ज्याला चक्क पाकिस्तानच्या मुलींनी केले होते प्रपोज

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---