आयपीएल 2023 हंगामासाठी बीसीसीआयने शुक्रवारी खेळाडूंचा लिलाव आयोजित केला होता. या लिलिवाता काही खेळाडूंवर पैशाचा जोरदार पाऊस पडला, तर काही खेळाडूंना खरेदी करण्यासाठी एकही संघ पुढे आला नाही. भारताचा वेगवान गोलंदाज संदीप शर्मा याच्यावर देखील या लिलावात कोणी बोली लावली नव्हती. आपण विकले न गेल्याने संदीप आश्चर्यचकित झाला आहे.
देशांतर्गत क्रिकेटमधील एक अनुभवी गोलंदाज म्हणून संदीप शर्मा याच्याकडे पाहिले जाते. मागील 9 वर्षापासून तो सातत्याने विविध संघांसाठी आयपीएल खेळताना दिसतो. अशा परिस्थितीतही त्याच्यामध्ये कोणीही रस दाखवला नाही. आपल्यावर कोणत्याही संघाने विश्वास न दाखवल्याने संदीप हैराण झाला. आपली प्रतिक्रिया देताना तो म्हणाला,
“मी खरोखरच खूप चकित झालो ज्यावेळी माझ्यावर कोणीही बोली लावली नाही. नक्की काय चुकले हेच मला समजत नव्हते. मला खूप विश्वास होता की मी एखाद्या संघाचा भाग असेल. आजवर मी जितके आयपीएल खेळलो त्यामध्ये माझी कामगिरी नक्कीच चांगली होती. सध्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये देखील माझी कामगिरी चांगली होत आहे.”
भारताच्या 2012 अंडर 19 विश्वचषक विजेत्या संघाचा सदस्य असलेल्या संदीपने 2013 मध्ये पंजाब संघासाठी खेळताना आयपीएल पदार्पण केलेले. पावर प्लेमध्ये चांगल्या इकॉनॉमी रेटने गोलंदाजी करण्यात तसेच मोक्याच्या क्षणी बळी घेण्यात तो यशस्वी ठरतो. यादरम्यान त्याला भारतासाठी दोन टी20 सामने खेळण्याची देखील संधी मिळाली. त्याने आयपीएलमध्ये पंजाब व्यतिरिक्त सनरायझर्स हैदराबाद संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याने आपल्या आयपीएल कारकीर्दीत आत्तापर्यंत 104 सामने खेळताना 114 बळी मिळवले आहेत. आयपीएलमध्ये विराट कोहली याला सर्वाधिक सात वेळा बाद करणारा फलंदाज म्हणून त्याची नोंद आहे.
(Sandeep Sharma Shocked After Get Unsold In IPL 2023 Auction)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
कॅमेरून ग्रीन दुखापतीमुळे 5 महिने क्रिकेटपासून दूर? मुंबईचे 17 कोटी पाण्यात
मोठी बातमी: कसोटी आणि वनडे क्रिकेटसाठी विराट टी20 मधून घेणार ब्रेक?