भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह मागच्या मोठ्या काळापासून दुखापतीचा सामना करत आहेत. दुखापतीमुळे बुमराह क्रिकेटच्या मैदानापासून दुर आहे. आयपीएल 2023 पूर्वी तो फिटनेस मिळवून मुंबई इंडियन्ससाठी सज्ज असेल, असे बोलले जात होते. मात्र, दुर्दैवाने बुमराह आगामी आयपीएल आणि जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम सामन्यात खेळणार नाहीये. अशात मुंबई इंडियन्सने आगामी आयपीएल हंगामाय बुमराहची जागा भरून काढण्यासाठी डावखुरा वेगवान गोलंदाज संदीप वॉरियर याला संधी दिली आहे. याबाबतची अधिकृत घोषणा फ्रॅंचाईजीने नुकतीच केली.
🚨 NEWS🚨@DelhiCapitals name Abhishek Porel as Rishabh Pant’s replacement; Sandeep Warrier joins @mipaltan as Jasprit Bumrah’s replacement.
Details 🔽 #TATAIPL https://t.co/NKrc6oLJrI
— IndianPremierLeague (@IPL) March 31, 2023
बुमराह आयपीएलमधून पुनरागमन करण्याची चर्चा सुरू होती. मात्र, न्यूझीलंड येथे पार पडलेल्या शस्त्रक्रियेनंतर बुमराह याचे पुनरागमन लांबले आहे. याच कारणाने तो आयपीएल व त्यानंतर जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत खेळणार नाही. मुंबई इंडियन्सने त्याचा पर्याय म्हणून अनुभवी डावखुरा वेगवान गोलंदाज संदीप वॉरियर याची निवड केली. भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केलेला संदीप यापूर्वी आयपीएल खेळला आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर व कोलकाता नाईट रायडर्स या संघाचे प्रतिनिधित्व त्याने केले होते. 2 सामन्यात त्याला पाच बळी घेण्यात यश आलेले. तसेच, 2021 मध्ये त्याने श्रीलंकेविरुद्ध भारतासाठी एकमेव टी20 सामना देखील खेळला होता.
मुंबई इंडियन्सचा संपूर्ण संघ –
आकाश मधवाल, अर्जुन तेंडुलकर, डेवाल्ड ब्रेविस, ऋतिक शौकीन, ईशान किशन, जेसन बेहरनडॉर्फ, संदीप वॉरियर, जोफ्रा आर्चर, कुमार कार्तिकेय सिंग, मोहम्मद अरशद खान, तिलक वर्मा, रमनदीप सिंग, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, टिम डेविड, ट्रिस्टन स्टब्स, कॅमरून ग्रीन, झाय रिचर्डसन, पीयूष चावला, डुआन जॅनसन, विष्णु विनोद, शम्स मुलानी, नेहल वधेरा, राघव गोयल.
(Sandeep Warrior replaces Jasprit Bumrah in Mumbai Indians For IPL 2023)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आयपीएल सुरू होण्याआधी अहमदाबादमध्ये पाऊस, पहिल्या सामन्यावर काय होणार परिणाम?
आयपीएलचा किताब न जिंकणारे 4 संघ, 2 नवीन कर्णधारासोबत उतरणार मैदानात, यावेळी फळफळणार का नशीब?