पुणे, 7 जानेवारी 2023: पाचव्या टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेत दुहेरीत बेल्जीयमच्या सँडर गिले व जोरन व्लिगेन या चौथ्या मानांकित जोडीने भारताच्या जीवन नेद्दुचेझियन व एन श्रीराम बालाजी यांचा 6-4, 6-4असा पराभव करून विजेतेपद संपादन केले. तर, भारताच्या जीवन नेद्दुचेझियन व एन श्रीराम बालाजी या जोडीने उपविजेतेपद पटकावले.
याआधी भारतीय जोडीने दुसऱ्या मानांकित जोडीचा सनसनाटी पराभव केला होता. श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी येथे पार पडलेल्या या स्पर्धेत दुहेरीत बेल्जीयमच्या सँडर गिले व जोरन व्लिगेन यांनी काल उपांत्य फेरीत अमेरिकेच्या राजीव राम व ग्रेट ब्रिटनच्या जॉय सॅलिसबरी या अव्वल मानांकित जोडीवर सनसनाटी विजय मिळवत अंतिम फेरी गाठली होती. आज 1 तास 10 मिनिटे चाललेल्याअंतिम फेरीच्या लढतीत पहिल्या सेटमध्ये बेल्जीयमच्या गिले व जोरन यांनी सामन्यात सुरेख सुरुवात करत तिसऱ्या गेममध्ये जीवन व बालाजी यांची सर्व्हिस भेदली व या सेटमध्ये वर्चस्व राखत हा सेट 6-4 असा जिंकून आघाडी मिळवली.
दुसऱ्या सेटमध्येदेखील पहिल्या सेटची पुनरावृत्ती पाहायला मिळाली. बेल्जीयमच्या जोडीने पुन्हा तिसऱ्या गेममध्ये सर्व्हिस भारतीय जोडीची सर्व्हिस भेदली व हा सेट 6-4 अशा सारख्याच फरकाने जिंकून विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. बेल्जीयमच्या सँडर गिले व जोरन व्लिगेन या जोडीने याआधी 2021मध्ये सिंगापूर येथील स्पर्धेत विजेतेपद पटकावले होते. दक्षिण आशियातील एकमेव एटीपी 250 स्पर्धा सूरू असलेल्या या स्पर्धेचे आयोजन महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटनेच्या वतीने आणि महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने करण्यात आले आहे. आयएमजीच्या मालकीच्या आणि राईजने जागतिक स्तरावर व्यवस्थापन केलेल्या टाटा ओपन महाराष्ट्र स्पर्धेला टाटा समूहाचे प्रायोजकत्व लाभले आहे.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: दुहेरी: अंतिम फेरी:
सँडर गिले(बेल्जीयम/जोरन व्लिगेन(बेल्जीयम )वि.वि.जीवन नेद्दुचेझियन/एन श्रीराम बालाजी(भारत) 6-4, 6-4.
(Sander Gille-Joran Vligen pair win title in Tata Open Maharashtra Tennis Tournament; Runner-up to Jeevan Nedduchessian-N Shriram Balaji of India)
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारतासाठी सूर्यकुमारने केली बोहनी! झळकावलं 2023चं पहिलं शतक, मागील 15 वर्षांची यादी पाहाच
सूर्याच्या शतकानंतर पुन्हा दिसला ‘सूरवीर’ बॉन्ड! विराटची इंस्टाग्राम स्टोरी होतेय व्हायरल