पुणे, २३ मे २०१७: महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए) आणि पीएमडीटीए यांच्या संलग्नतेने आयोजित एमएसएलटीए-योनेक्स सनराईज ११व्या रमेश देसाई मेमोरिअल कुमार राष्ट्रीय(१६ वर्षाखालील)टेनिस स्पर्धेत मुलींच्या गटात हरियाणाच्या संदीप्ती राव, तेलंगणाच्या स्म्रिती भसिन, तामिळनाडूच्या दिपलक्ष्मी वनराजा या खेळाडूंनी मानांकित खेळाडूंवर विजय मिळवत आगेकूच केली.
एमएसएलटीए स्कुल ऑफ टेनिस, श्री शिवछ्त्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी येथे सुरु असंलेल्या या स्पर्धेत मुलींच्या गटात दुसऱ्या फेरीत हरियाणाच्या व बिगरमानांकित संदीप्ती रावने सातव्या मानांकित व तेलंगणाच्या मुबाशिरा शेखचा ६-२, ६-० असा सहज पराभव करून सनसनाटी निकाल नोंदविला. तेलंगणाच्या स्म्रिती भसिन हिने चतुराईने खेळ करता आठव्या मानांकित व हरियाणाच्या स्म्रिती सिंगचा ४-६, ७-५, ६-२ असा तीन सेटमध्ये पराभव केला. तामिळनाडूच्या दिपलक्ष्मी वनराजा याने सोळाव्या मानांकित व हरियाणाच्या इशिता सिंगचा ७-५, ३-६, ६-३ असा पराभव करून अनपेक्षित निकाल नोंदविला. अव्वल मानांकित महाराष्ट्राच्या सालसा आहेर हिने आपलीच राज्य सहकारी गार्गी पवारवर ६-०, ६-२ असा सहज विजय मिळवला.
मुलांच्या गटात काल मानांकित खेळाडूवर सनसनाटी विजय मिळविणाऱ्या गिरीश चौगुले याने चंदीगढच्या क्रिशन हुडाचा २-६, ६-३, ६-४ असा पराभव करून आपली विजयी घौडदौड कायम ठेवली. गुजरातच्या क्रिश पटेलने कर्नाटकाच्या अर्णव फतंगेचा ६-२, ६-२ असा सहज पराभव केला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: दुसरी फेरी: 16 वर्षाखालील मुली: सालसा आहेर(महा,१)वि.वि.गार्गी पवार(महा)६-०, ६-२;बेला ताम्हणकर(महा,१६)वि.वि.मालविका शुक्ला(महा)६-२, ३-६, ६-२; संदीप्ती राव(हरियाणा) वि.वि.मुबाशिरा शेख(तेलंगणा,७)६-२, ६-०;भक्ती परवानी(गुजरात, ४)वि.वि.जगमीत कौर(दिल्ली)६-३, ३-६, ६-२; कशिश भाटिया वि.वि.कृतिका छाब्रा(महा)७-५, ६-३;धरणा मुदलियार(महा,५)वि.वि.अमिक बट्(ओरिसा)६-३, ७-५; संस्कृथी ढमेरा(तेलंगणा,१२)वि.वि.सृथि पंडिथरून(तामिळनाडू)६-२, ६-३;वंशिका चौधरी(उत्तरप्रदेश,१३)वि.वि.अनु वर्मा(दिल्ली)६-०, ६-२; रिचा चौगुले(महा,९)वि.वि.पूजा इंगळे(महा)७-५, ६-४; प्रेरणा विचारे(महा,६)वि.वि.गौरी भागिया ६-४, ४-६, ७-५; स्म्रिती भसिन(तेलंगणा)वि.वि.स्म्रिती सिंग(हरियाणा,८)४-६, ७-५, ६-२;दिपलक्ष्मी वनराजा(तामिळनाडू)वि.वि.इशिता सिंग(हरियाणा,१६)७-५, ३-६, ६-३; प्रतिभा नारायण(कर्नाटक,३)वि.वि.सान्या सिंग(महा)६-०, ६-३; तनिशा कश्यप(आसाम,२)वि.वि.किरण राणी(तामिळनाडू)६-०, ६-०; सुदिप्ता कुमार(महा)वि.वि.मल्लिका मराठे(महा,११)१-२ सामना सोडून दिला.
१६ वर्षांखालील मुले: गिरीश चौगुले(महा)वि.वि.क्रिशन हुडा(चंदीगढ)२-६, ६-३, ६-४;क्रिश पटेल(गुजरात)वि.वि.अर्णव फतंगे(कर्नाटक)६-२, ६-२; कबीर हंस(ओरिसा,११)वि.वि.अनमोल जैन(दिल्ली)६-२, ६-१; केविन पटेल(गुजरात,६)वि.वि.संस्कार चौबे(गुजरात)६-०, ६-०; अमन खान(आंध्रप्रदेश,१५)वि.वि.सुशांत दबस ६-३, ६-२.