मुंबई । सौरव गांगुली 2000च्या सुरुवातीला भारताचा कर्णधार होता आणि त्याच्या निर्भिड नेतृत्वाखाली भारतीय संघाने अनेक मोठे विजय मिळवले. क्रिकेटमधून निवृत्तीनंतर गांगुलीने हळू हळू आपले लक्ष प्रशासनाकडे वळवले. तो प्रथम बंगाल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष झाला आणि त्यानी क्रिकेट प्रशासनात सुधारण्यासाठी काम केले.
त्यानंतर गेल्या वर्षी गांगुलीची एकमताने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अध्यक्षपदी निवड करण्यात आली. आता गांगुलीची नजर आयसीसीच्या अध्यक्षपदावर आहे. शशांक मनोहर यांनी अलीकडेच अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि अनेक क्रिकेटपटूंनी गांगुलीला आयसीसीचे पुढील अध्यक्ष होण्यास पाठिंबा दर्शविला.
श्रीलंकेचा दिग्गज क्रिकेटर कुमार संगकारानेही सांगितले की,” गांगुली हे हुशार असल्यामुळे या पदासाठी योग्य उमेदवार आहेत. मला वाटते सौरव नक्कीच तो बदल घडवून आणू शकेल. मी एक क्रिकेटपटू म्हणून त्याचा खूप मोठा चाहता आहे, परंतु मला वाटते की त्याच्याकडे अत्यंत सूक्ष्म क्रिकेटपटूच मन आहे. त्याच्याकडे खेळाची आवडही आहेत.”
तो म्हणाला, ”तुमची मानसिकता खरोखरच आंतरराष्ट्रीय पातळीवरची असली पाहिजे. मी भारतीय आहे, श्रीलंकन किंवा ऑस्ट्रेलियन किंवा इंग्लिश आहे, असे बोलण्याने काही फरक पडत नाही. मी एक क्रिकेटर आहे आणि मी जे करत आहे ते सर्वात चांगले आहे, हे त्यांना खरोखर समजले पाहिजे.”
”सर्वात महत्त्वाचे म्हणजे या खेळाचा पाया जगभरातील मुले, चाहते आणि प्रेक्षक आहेत. मला वाटते सौरव खूप चांगले काम करू शकेल. बीसीसीआयचे अध्यक्ष म्हणून त्यानी जगभरातील खेळाडूंशी संवाद साधला हे मी पाहिले आहे. एमसीसी क्रिकेट समितीवर येण्यापूर्वीच मी त्याचे कार्य पाहिले आहे. सौरव हे करण्यासाठी योग्य उमेदवार असेल यात मला शंका नाही, ” असे कुमार संगकारा म्हणाले.
क्रिकेट दक्षिण आफ्रिका (सीएसए) क्रिकेटचे संचालक ग्रॅमी स्मिथ यांनाही सौरव गांगुलीने क्रिकेटच्या या कठीण काळात आयसीसीचे अध्यक्षपद स्वीकारण्याची इच्छा व्यक्त केली आहे. सीएसएचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॅक फॉल यांनी स्मिथच्या याविधानाचे समर्थन केले आणि ते म्हणाले की, “भारतीयाने आयसीसीमध्ये परत जाण्यास दक्षिण आफ्रिकेचा कोणताही आक्षेप नाही.”
महत्त्वाच्या बातम्या-
आता हिंदीमध्येही वाचायला मिळणार क्रिकेटचे नियम; भारताच्या या पंचाने केले नियमांचे भाषांतर
आयपीएलमधील ‘हा’ संघ घेऊन येत आहे डॉक्यूमेंटरी सिरिज; नाव आहे…
वीजेचे बिल पाहून हा क्रिकेटपटू भडकला; म्हणाला, संपूर्ण मोहल्ल्याचे बिल पाठवले की काय…
ट्रेंडिंग लेख-
यूएईमध्ये आयपीएल सामन्यात सर्वात वेगवान अर्धशतक ठोकणारे फलंदाज; एका भारतीयाचा समावेश
२०२० आयपीएल युएईमध्ये झाली, तर दिल्ली कॅपिटलचे हे ४ खेळाडू करु शकतात दमदार कामगिरी
काय सांगता! या ३ वेळेला संपूर्ण संघाला मिळूनही करता आल्या नाहीत १० धावा