---Advertisement---

जावयाच्या कामगिरीवर सासरे खूश; खास आकडेवारीसह केली धोनीशी तुलना

On: गुरूवार, ऑक्टोबर 28, 2021 11:28 AM
---Advertisement---

पाकिस्तानचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू शोएब मलिकने मंगळवारी यूएई आणि ओमानमध्ये खेळल्या जात असलेल्या टी२० विश्वचषकाच्या महत्त्वपूर्ण सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध आपल्या संघाला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. न्यूझीलंड संघासमोर धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना संघ अडचणीत असल्याचे दिसत असताना त्याने २६ धावांची नाबाद खेळी केली. आसिफ अलीसोबत त्याने सहाव्या गड्यासाठी ३.५ षटकात ४८ धावा जोडल्या आणि संघाला सलग दुसरा विजय मिळवून दिला. त्याच्या या कामगिरीनंतर त्याचे सासरे म्हणजेच सानिया मिर्झाचे वडील इम्रान मिर्झा यांनी एक पोस्ट शेअर करताना त्याची तुलना भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीशी केली आणि हा विचित्र योगायोग असल्याचे म्हटले.

त्यांनी ही पोस्ट इंस्टाग्रामवर शेअर केली आहे. त्यांनी त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘जगातील दोन सर्वोत्तम टी२० खेळाडू एमएस धोनी आणि शोएब मलिक यांच्या या आकड्यांमधील आश्चर्यकारक योगायोग पहा.” त्यांच्या आकडेवारीनुसार, धोनी आणि शोएब यांनी टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यात १७ ते २० षटकात एकसमान खेळ केला. लक्ष्याचा पाठलाग करताना या दोघांनी १८९ चेंडूत २९५ धावा केल्या आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, या कालावधीत दोन्ही खेळाडूंनी १५६.८ च्या समान स्ट्राइक रेट आणि ४९.१७ च्या प्रभावी सरासरीने या धावा केल्या आहेत. सानियाच्या वडिलांच्या या पोस्टवर लोकांनी जोरदार कमेंट करत दोन्ही खेळाडूंना महान म्हटले आहे.

https://www.instagram.com/p/CVhro1qPnmg/?utm_medium=copy_link

धोनीबद्दल बोलायचे झाले तर तो सध्या युएईमध्ये आहे आणि भारतीय संघाच्या मेंटरची भूमिका बजावत आहे. धोनीच्या मार्गदर्शनाखाली, संघाने दोन्ही सराव सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडसारख्या बलाढ्य संघांना पराभूत केले होते. परंतु, संघाला त्यांच्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानकडून १० गड्यांनी मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. गेल्या २९ वर्षांतील विश्वचषकातील पाकिस्तानकडून भारताचा हा पहिलाच पराभव आहे. याआधी दोन्ही संघांमध्ये वनडे व टी२० विश्वचषकात १२ सामने खेळले गेले होते. ज्यामध्ये भारतीय संघाने प्रत्येक वेळी विजय मिळवला होता.

महत्त्वाच्या बातम्या-

विंडीजचा संघ करणार जरबदस्त पुनरागमन! आयपीएलमध्ये चमकलेल्या ‘या’ धाकड अष्टपैलूला दिलीय संधी

झेल सुटला, पण बांगलादेशी क्षेत्ररक्षकाच्या प्रयत्नांनी जिंकली सामना दर्शकांची मने; आयसीसीकडूनही कौतुक

बीसीसीआय अध्यक्ष गांगुलीचा ‘या’ पदावरुन राजीनामा, आयपीएलच्या २ नव्या संघांशी जोडलेले आहे प्रकरण

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---