रोहन बोपन्नाला मिश्र दुहेरीमध्ये उप-उपांत्य फेरीत पराभवाला सामोरे जावे लागल्यामुळे यूएस ओपन २०१७मध्ये सानिया मिर्झाच्या रूपाने भारतीयांचे एकमेव आव्हान बाकी आहे. सानिया मिर्झा तिची चीनची जोडीदार शुई पेंगबरोबर महिला दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत पोहचली आहे.
या स्पर्धेतुन यापूर्वीच लिएंडर पेस, पुरव राजा, डिविज शरण आणि रोहन बोपण्णा हे खेळाडू बाहेर पडले आहे. कनिष्ठ गटात आज महक जैन आणि मिहिका यादव या दोन भारतीय खेळाडूंचा पहिल्या फेरीचा दुहेरीचा सामना कोर्ट नंबर १०वर होत आहे तर सिद्धांत बांठियासुद्धा मुलांच्या दुहेरीमध्ये दुसऱ्या फेरीचा सामना खेळणार आहे.
स्पर्धेत आव्हान राखणारे भारतीय खेळाडू
सानिया मिर्झा – महिला दुहेरी
महक जैन/ मिहिका यादव – मुलींची दुहेरी
सिद्धांत बांठिया – मुलांची दुहेरी