सानिया मिर्झा हिचे टेनिस कारकिर्दीतील शेवटचे ग्रँड स्लॅम जिंकण्याचे स्वप्न अपूर्णच राहिले. ऑस्ट्रेलिया ओपनच्या मिश्र दुरेरीत सानिया मिर्झा आणि रोहन बोपन्ना ही जोडी अंतिम सामन्यापर्यंत पोहोचली. पण ब्राझीलच्या जुईसा स्टेफनी आणि रोफेल माटोल यांनी भारतीय जोडीला पराभूत केले. फेब्रुवारी महिन्यात सानिया मिर्झा तिच्या टेनिस कारकिर्दीतील शेवटची स्पर्धा खेळणार असल्यामुळे आता पुन्हा तीतन ग्रँड स्लॅमच्या शर्यतीत दिसणार नाही.
अंतिम सामन्यात पराभव स्वीकारल्यानंतर सानिया मिर्झा (Sania Mirza) मेलबर्न रॉड लेवर एरिनावर बोलण्यासाठी आली, तेव्हा तिला अश्रू अनावर झाले. ती म्हणाली की, “हे आनंदाचे अश्रू आहेत. 18 वर्षांपूर्वी मेलबर्नमध्ये कारकिर्दीची सुरुवात झाली. कारकिर्दीचा शेवट करण्यासाठी देखील यावेळा चांगली जागा असू शकत नाही. मला याठिकाणी घरच्यासारखा अनुभव करून दिल्याबद्दल सर्वांचे आभार.” तत्पूर्वी 2023 च्या सुरुवातीला सानियाने तिच्या निवृत्तीची घोषणा केली होती. 19 फेब्रुवारीला होणाऱ्या डब्ल्यूटीए 1000 स्पर्धा हा तिच्या कारकिर्दीचा शेवट असेल. दुबईमध्ये खेळल्या जाणाऱ्या या स्पर्धेनंतर सानिया पुन्हा टेनिस कोर्टवर खेळताना दिसणार नाही.
मिश्र ग्रँड स्लॅमचा अंतिम सामना गमावल्यानंतर सानिया खूपच भावूक झाली होती आणि यावेळी तिने सहकारी रोहन बोपन्ना () याचे देखील आभार मानले, जो मागच्या मोठ्या काळापासून तिच्यासोबत खेळत आला आहे. सानिया म्हणाली, “14 वर्षांची असताना तिचा पहिला मिश्र दुहेरीचा जोडीदार बोपन्नाच होता.” यावेळी सानिया आणि बोपन्नाचे कुटुंबीय उपस्थित होते. सानियाचा पती आणि पाकिस्तानचा दिग्गज क्रिकेटपटू सोएब मलिक मात्र यावेळी उपस्थित नव्हता.
“My professional career started in Melbourne… I couldn’t think of a better arena to finish my [Grand Slam] career at.”
We love you, Sania ❤️@MirzaSania • #AusOpen • #AO2023 pic.twitter.com/E0dNogh1d0
— #AusOpen (@AustralianOpen) January 27, 2023
सानिया मिर्झाविषयी बोलताना बोपन्ना म्हणाला, “तू तुझ्या खेळातून इतके वर्ष देश आणि जगभरातील लोकांना प्रेरणा देण्याचे काम केले आहे. यासाठी तुझे कौतुक.” मिश्र दुरेरीच्या या अंतिम सामन्याचा विचार केला, तर लुईसा आणि राफेल यांच्यानी त्याच्या कारकिर्दीतील पहिले ग्रँड स्लॅम जिंकले. पहिल्या सेटमध्ये 6-7 अशी कामगिरी केली, तर दुसऱ्या सेटमध्येही ब्राजीलच्या जोडीने त्यांना पुनरागमनाची संधी दिली नाही. दुसऱ्या सेटमध्ये सानिया-बोपन्नाने 6-2 अशा अंतराने गमावला. सानियाने 6 वर्षांपूर्वी 2017 मध्ये फ्रेंच ओपनचे मिश्र दुरेही विजेतेपद पटकावले होते. तसेच 2009 ऑस्ट्रेलिया ओपनमध्ये सानियाने महेश भुपतीसोबत मिळून विजेतेपद पटकावले होते. सानियाने तिच्या कारकिर्दीत एकूण 6 ग्रँड स्लॅम्स जिंकले आहेत. (Sania Mirza lost in the last Grand Slam final of her career)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
वाढदिवस विशेष : क्रिकेटचा हॅरी पॉटर अर्थात न्यूझीलंडचा फिरकीपटू ‘डॅनियल व्हेट्टोरी’; जाणून घ्या त्याचे खास विक्रम
VIDEO | राहुलपाठोपाठ अक्षर पटेलही अडकला लग्नबंधनात, धुमधडाक्यात निघाली अष्टपैलूची वरात