भारताचा स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा 12 एप्रिल 2010 मध्ये लग्नबंधनात अडकली. पाकिस्तानचा अष्टपैलू क्रिकेटपटू शोएब मलिक याच्याशी सानियाने विवाहगाठ बांधल्यानंतर चर्चांना उधान आले होते. पण मागच्या 13 वर्षांमध्ये या दोघांनी सुखी संरार करून दाखवला. असे असले तरी, शनिवारी (20 जानेवारी) शोएब आणि सानिया वेगळे झाल्याचे उघड झाले. याच पार्श्वभूमीवर सानियाचे एक विधान समोर येत आहे.
पाकिस्तानचा दिग्गज क्रिकेटपटू अससेला शोएब मलिक शनिवारी तिसऱ्यांना लग्नबंधनात अडकला. पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेद शोएबची नवी नवरी बनली आहे. तसे पाहता शोएब मलिक आणि सानिया मिर्झा यांच्यातील भांडन आणि घटस्फोटाच्या बातम्या मागच्या वर्षभरापासून येत होत्या. पण दोघांपैकी एकाणेही याबाबत प्रतिक्रिया दिली नाही. शनिवारी शोएब आणि सना जावेद यांचा विवाह झाला, त्याआधी सानियाची महत्वाची प्रतिक्रिया सर्वांना मिळाली होती. तिने बुधवारी (17 जानेवारी) आपल्या सोशल मीडिया खात्यावरून शेअर केलेली स्टोरी एकप्रकारे शोएब लवकरच लग्न करणार, याचे संकेत होते.
सानियाने बुधवारी स्टोरीला शेअर केलेले कोट आता पुन्हा व्हायरल होत आहे. यात स्टार टेनिसपटू म्हणते की, “लग्न अवघड आहे. घटस्फोट देखील अवघड आहे. पण आपण अवघड निवडले पाहिजे. लठ्ठपणा अवघड बाब आहे. फिट राहणेही अवघड आहे. तुमच्यासाठी अवघड अससेले निवडा. कर्जबाजारी होणे अवघड आहे. आर्थिक दृष्ट्या शिस्तप्रिय असणेही अवघड आहे. अवघड असलेले निवडा. संवाद करणेही अवघड आहे आणि संवाद टाळणेही अवघड आहे. पण अवघड निवडा. आयुष्य कधीच सोपे नसेल. ते नेहमीच अवघड असेल. पण आपण अवघड निवडू शकतो. हुशारीने निवडा.”
Marriage is hard. Divorce is hard. Choose your hard.
A day after Sania Mirza’s cryptic post, #ShoaibMalik remarried with actress Sana Javaid who recently got divorce from Umair Jaswal. pic.twitter.com/qb7EPeY5LG
— Hina Safdar (@hinasafi) January 20, 2024
दरम्यान, शोएब आणि सानिया यांना एक मुलगा आहे. त्याचे नाव इजहान आहे आणि आई वडिलांच्या घटस्फोटानंतर त्याच्या संगोपनाबाबत प्रश्न उपस्थित होत आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार दोघांच्या घटस्फोटानंतर इजहान दुबईत राहणार असून त्याचा सर्व घर्ज सानिया आणि शोएब बरोबरीने करतील. (Sania Mirza’s reaction to Shoaib Milk’s marriage)
महत्वाच्या बातम्या –
कोण आहे शोएब मलिकची तिसरी पत्नी सना जावेद, जिच्यासाठी पाकिस्तानी क्रिकेटरने सानिया मिर्झाला सोडले
‘रिंकू एमएस धोनी आणि युवराज सिंगचा वारसा पुढे नेणार’, अफगाणिस्तान फलंदाजाचं भाकित