भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज गोलंदाज जसप्रीत बुमराहने काही दिवसांपूर्वीच लग्नगाठ बांधली. त्याने पेशाने मॉडेल आणि स्पोर्ट्स अँकर असणार्या संजना गणेशनशी विवाह केला. गोव्यात १५ मार्चला हा विवाह सोहळा संपन्न झाला.
मात्र आता लग्नाला केवळ १० दिवस होत नाही तोच संजना अजून एका खास कारणाने चर्चेत आली आहे. लग्नाला केवळ १० दिवस उलटले असतांना ती आपल्या कामावर रुजू झाली आहे.
१५ मार्चला खाजगी समारंभात पार पडला होता विवाह
जसप्रीत बुमराह आणि संजना गणेशन यांचा विवाह सोहळा १५ मार्चला एका खाजगी समारंभात संपन्न झाला होता. गोव्यात झालेल्या या विवाह सोहळ्याला अवघे २० निकटवर्तीय उपस्थित होते. लग्नानंतर या दोघांनी सोशल मिडीयावर याची माहिती देत फोटो शेअर केले होते. ज्याला चाहत्यांची मोठ्या प्रमाणावर पसंती मिळाली होती.
स्टार स्पोर्ट्सवर होस्ट केला शो
या लग्नाला १० दिवस होत नाही तोच संजना आपल्या कामावर पुन्हा एकदा रुजू झाली आहे. भारत विरुद्ध इंग्लंडच्या दुसर्या वनडे सामन्यादरम्यान ती स्टार स्पोर्ट्स या वाहिनीवर एक शो होस्ट करत असल्याचे दिसून आले. या शो मध्ये भारताचे माजी खेळाडू व्हीव्हीएस लक्ष्मण आणि इरफान पठाण देखील सहभागी झाले होते. तिने कामाप्रति दाखवलेल्या या निष्ठेमुळे तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कोण आहे संजना गणेशन?
संजना एक अँकर आहे व तिला आयपीएल दरम्यान अनेक वेळा बुमराहला प्रश्न विचारताना चाहत्यांनी पाहिले आहे. संजना एक हुशार अँकर म्हणून ओळखली जाते. संजनाने पुण्यातून शिक्षण घेतले आहे. तिने इंजीनिअरिंग केले असून पुण्यातील सिंबायोसिस इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजीमध्ये ती शिकली आहे.
संजनाने रिऍलिटी शो रोडीजमधून आपल्या करियरची सुरुवात केली होती. त्यानंतर तिने मॉडेलिंगमध्येही नशीब आजमावलं होतं. २०१४ साली ती मिस इंडिया स्पर्धेच्या अंतिम फेरीपर्यंत पोहचली होती. तिने २०१३ साली फेमिना गॉर्जियस हा पुरस्कार देखील जिंकला होता. क्रिकेट सोडून संजनाने फूटबॉल व बॅडमिंटन खेळांच्या शोमध्ये देखील होस्ट म्हणून काम पाहिले आहे.
महत्वाच्या बातम्या:
विराट जिथे विक्रम तिथे! एकाच क्रमांकावर १०,००० वनडे धावा; पाँटिंगची केली बरोबरी
ना सचिन, ना धोनी; पुण्यनगरीत असा विक्रम करणारा विराट कोहली ठरला जगातील पहिला क्रिकेटपटू