---Advertisement---

वर्ल्डकप जिंकल्यानंतर पत्नीनं घेतली मुलाखत पण बुमराहला शब्द फुटेना, पाहा मैदानावरील व्हिडिओ

On: रविवार, जून 30, 2024 1:45 PM
Jasprit Bumrah
---Advertisement---

यंदाचा टी20 विश्वचषक जिंकून भारतानं इतिहास रचला आहे. फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव करुन टीम इंडियानं दुसऱ्यांदा या टी20 विश्वचषकाच्या ट्रॉफीवर नाव कोरले. तत्पूर्वी बुमराहनं या विश्वचषक स्पर्धेत शानदार गोलंदाजी केली. फायनलमध्येही त्यानं 2 विकेट्स घेतल्या. विजयानंतर त्याची पत्नी संजना गणेशननं त्याची मुलाखत घेतली. मुलाखत घेताना जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) खूप भावूक झाला होता.

मुलाखतीत त्याची पत्नी संजना गणेशननं (Sanjana Ganesan) त्याला विचारलं की, “भारताने 13 वर्षांनंतर विश्वचषक जिंकला. तुला कसं वाटत आहे? बुमराह म्हणाला, “आम्ही खूप तणावात होतो पण आता खूप आनंदी आहे. जिंकण्याचा मार्ग हा आमच्यासाठी मोठा विजय आहे. वडील म्हणून इथं जिंकलो आहे. याच्यापेक्षा चांगली फिलिंग काय असू शकते? या स्पर्धेत चांगले योगदान देताना खूप छान वाटलं. आम्ही खूप शांतपणे खेळलो. आम्ही नाराज नव्हतो.”

संजनानं त्याला पुढे विचारले, “शेवटच्या षटकात तू, अर्शदीप आणि हार्दिकनं अप्रतिम गोलंदाजी केल्याचे दिसले. या मागचा विचार काय होता? यावर जसप्रीत बुमराह म्हणाला, “आम्हाला खूप आत्मविश्वास होता.”

 

View this post on Instagram

 

A post shared by ICC (@icc)

 

फायनल सामन्याच्या 18व्या षटकात बुमराहनं मार्को यान्सेनला (Marco Jansen) बाद करुन सामन्यावर भारताची पकड मजबूत केली. बुमराहनं फायनल सामन्यात 4 षटकं टाकली आणि 18 धावा देऊन 2 विकेट्स घेतले. यंदाच्या टी20 विश्वचषकाबद्दल बोलायचं झालं तर बुमराहनं 8 सामन्यात एकूण 15 विकेट घेतल्या. या स्पर्धेत तो सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत तो तिसऱ्या स्थानावर आहे.

यंदाच्या टी20 विश्वचषकात जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) ‘प्लेअर ऑफ द सीरीज’ जिंकल्यानंतर म्हणाला, “मी टी20 विश्वचषक स्पर्धेत शांत राहण्याचा प्रयत्न केला. मी खरोखर खूप आनंदी आहे, माझा मुलगा येथे आहे, कुटुंब येथे आहे आणि आम्ही यासाठी कठोर परिश्रम करत आहोत, यापेक्षा चांगली भावना असू शकत नाही.”

बुमराहचं वय सध्या 30 वर्ष आहे. त्यानं टी20 आंतरराष्ट्रीय कारकीर्दीमध्ये 70 सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्यानं 17.74च्या सरासरीनं 89 विकेट्स घेतल्या आहेत. यादरम्यान त्याची इकाॅनाॅमी 6.27 राहिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

टीम इंडियाच्या विजयानंतर ढसाढसा रडला इरफान पठाण; म्हणाला, “मागील दहा दिवस…”
भारतीय संघ टी20 विश्वविजेता! पीएम मोदींकडून मिळाल्या खास शुभेच्छा
“कहीं खुशी कहीं गम” रितिकाचा विश्वविजेता कर्णधार रोहितवर प्रेमाचा वर्षाव, तर मिलरच्या पत्नीनं सावरलं

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---