शुक्रवारी (८ ऑक्टोबर) मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात पार पडलेल्या सामन्यात चाहत्यांचे चांगलेच मनोरंजन झाले. मुंबईचा सलामीवीर ईशान किशनने ८४ आणि सूर्यकुमार यादवने ८२ धावांची खेळी करून चाहत्यांची मने जिंकली. तसेच सामन्यात एक अशी घटनाही घडली, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सामन्यात मुंबईचा अष्टपैलू कायरन पोलार्डच्या पायाला चेंडू लागला आणि हैदराबादच्या गोलंदाजांकडून पायचितसाठी अपील करण्यात आली. यावर मैदानी पंचांनी पोलार्डला बाद दिले. मग पोलार्डने डीआरएस घेतला. यात तिसऱ्या पंचाने त्याला नाबाद करार दिला. पंचांनी दिलेल्या या निर्णयानंतर स्टॉन्ड्समधील एक व्यक्ती खूप आनंदी दिसली. या व्यक्तीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावार व्हायरल होत आहे.
मुंबईच्या डावाच्या ११ व्या षटकात हैदराबादचा सिद्धार्थ कौल गोलंदाजी करत होता. त्याच्या षटकातील दुसरा चेंडू पोलार्डच्या पायाला लागला आणि सिद्धार्थने पंचांकडे पायचितची अपील केली होती आणि पंचांनी त्याला बाद करार दिला. त्यानंतर मुंबईने डिआरएस घेण्याचा निर्णय घेतला, पण पोलार्डलाही वाटले तो बाद झाला आणि तो मैदानाबाहेर जाऊ लागला होता. पण तिसऱ्या पंचांच्या रिव्हूमध्ये पाहिले गेले की, चेंडू स्टंपच्या वरून जात आहे. रिव्हूमुळे पंचांना त्यांनी घेतलेला निर्णय माघारी घ्यावा लागला आणि पोलार्डला नाबाद करार देण्यात आला. तिसऱ्या पंचांच्या निर्णयानंतर मैदानात सामन्याचा आनंद घेणारी, जसप्रीत बुमराहची पत्नी संजना खूप खुश झालेली दिसली. तिने उभे रहून पोलार्डसाठी टाळ्याही वाजवल्या.
Mumbai Fixing Indians 👏 pic.twitter.com/xclEp2nR2T
— Dhoni Army TN™ (@DhoniArmyTN) October 8, 2021
मुंबईला प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी या सामन्यात मोठी धावसंख्या करणे आवश्यक होते आणि त्यामुळे मुंबईच्या प्रत्येक चाहत्याची इच्छा होती की, पोलार्ड मैदानात टिकून राहावा आणि संघासाठी मोठी खेळी करावी. त्यामुळेच पोलार्डला नाबाद करार देण्यात आल्यानंतर बुमराहची पत्नीही आनंदी दिसली.
— No caption needed (@jabjabavas) October 8, 2021
चाहत्यांनी पोलार्डकडून मोठ्या खेळीची अपेक्षा असली तरी हीतो या अपेक्षांना पात्र ठरला नाही. त्याने सामन्यात १२ चेंडू खेळले आणि केवळ १३ धावा केल्या. सामन्यात मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ९ विकेट्सच्या नुकसानावर २३६ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात हैदराबाद संघ २० षटकात ८ विकेट्सच्या नुकसानावर १९३ धावा करू शकला आणि परिणामी मुंबईने ४२ धावांनी सामना जिंकला.
महत्त्वाच्या बातम्या-
गाडी क्रमांक १५५२…! विजयानंतरही मुंबई प्लेऑफच्या शर्यतीतून ‘आऊट’, चाहत्यांकडून मीम्सचा वर्षाव
आयपीएल २०२१ला मिळाले टॉप-४ संघ, ‘असे’ होतील प्लेऑफ आणि फायनलचे सामने; पाहा संपूर्ण वेळापत्रक
टेबल टॉपर्सलाही चोपलं! दिल्लीविरुद्ध मॅक्सवेलचे झंझावाती अर्धशतक, मोठ्या विक्रमांची खात्यात भर