भारतीय क्रिकेट संघाला २०२१ वर्षाच्या अखेरीस दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर (India’s tour of South Africa) जायचे आहे. या दौऱ्यात ३ कसोटी आणि ३ वनडे सामन्यांची मालिका होणार आहे. या मालिकांसाठी अद्याप भारतीय संघाची घोषणा झालेली नाही. मात्र, या दौऱ्यात कोणकोणत्या खेळाडूंना संधी मिळणार याबद्दल विविध मतं व्यक्त केली जात आहेत. आता भारताचे माजी फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर यांनी याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.
मयंक अगरवालने न्यूझीलंड विरुद्ध मुंबई कसोटीत १५० धावांची खेळी करूनसुद्धा दक्षिण आफ्रिकेत त्याला सलामी फलंदाजीची संधी मिळणार नाही, असं मत संजय बांगर (Sanjay Bangar) यांनी व्यक्त केले आहे. संजय बांगर यांच्यानुसार दक्षिण आफ्रिकेत केएल राहुल (KL Rahul) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) यांनाच प्रथम संधी देण्यात येईल आणि मयंक अगरवाल (Mayank Agarwal) राखीव पर्याय असेल.
मयंक अगरवालने न्यूझीलंड विरुद्ध मुंबई कसोटीत पहिल्या डावांत १५० धावांची उत्कृष्ट खेळी केली आणि दुसऱ्या डावांत सुद्धा ६२ धावा करून विजयात मोलाचं योगदान दिलं.
संजय बांगर यांचं असं म्हणणं आहे की, मयंक सलामीवीर म्हणून पर्यायच असणार. केएल राहुल आणि रोहित शर्मा यांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल. स्टार स्पोर्ट्सवर बोलताना ते म्हणाले, केएल राहुल आणि रोहित शर्मा यांनीच सलामीवीर म्हणून फलंदाजी केली पाहिजे. भलेही मयंकने शतक मारले असेल, पण तुम्ही केएल राहुल आणि रोहित शर्मा यांच्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही.
या दोन्ही खेळाडूंचं इंग्लंड दौऱ्यात योगदान खूप महत्त्वाचं होतं. रोहित शर्माने सलामीवीर फलंदाज म्हणून १००० चेंडूंचा सामना केला आणि जेव्हा तुमचा सलामीवीर फलंदाज एवढे चेंडू खेळत असेल, तर विदेशी खेळपट्ट्यांवर खेळणं अजून सोपं होतं. दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड आणि इंग्लंड देशांमध्ये स्विंग आणि सीम समोर फलंदाजांच्या शैलीची परीक्षा असते.
भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर (India Tour of South Africa) कसोटी सामने आणि वनडे खेळणार आहेत. २६ डिसेंबरपासून कसोटी मालिकेने या दौऱ्याला सुरुवात होईल.
महत्त्वाच्या बातम्या –
कर्णधार म्हणून पहिल्याच सामन्यात कमिन्सची ऐतिहासिक कामगिरी; ५९ वर्षांनतर केलाय ‘असा’ कारनामा
मन जिंकलस भावा! ‘आरसीबी’चा जयघोष करणाऱ्या चाहत्यांना सिराजचा इशारा ‘इंडियाला चीअर करा’- Video
भारीच ना!! वामिकाचा वाढदिवस होणार खास; विराट लाडक्या लेकीला देणार खास भेट