भारतात सर्वात लोकप्रिय खेळ म्हणून क्रिकेटला पसंती दिली जाते. त्याचबरोबर भारतीय संघ हा जगातील सर्वात यशस्वी संघांपैकी एक आहे. कारण भारतीय संघासाठी बर्याच माजी खेळाडूंनी चांगली कामगिरी करून आपल्या देशाचे नाव जगभरात गाजवले आहे. अशाच दिग्गज खेळाडूंची आता दुसरी पिढीसुद्धा त्यांच्या पावलांवर पाऊल ठेवून भारतीय संघाचे प्रतिनिधित्त्व करण्याचे स्वप्न उराशी बाळगत आहेत. भारतीय संघाच्या बऱ्याच खेळाडूंचे स्वप्न असते की आपल्याप्रमाणे आपल्या मुलांनीही भारतीय संघाचे प्रतिनिधित्त्व करावे, पण यापैकी फार कमी दिग्गज खेळाडूंची स्वप्ने साकार होतात.
त्यामुळे आज आपण कोणत्या तीन दिग्गज खेळाडूंची मुले भविष्यात भारतीय संघाचे सदस्य म्हणून सहभागी होऊ शकतात हे जाणून घेणार आहोत.
1. संजय बांगर
भारतीय संघाचे माजी अष्टपैलू खेळाडू संजय बांगर हे भारतीय संघाकडून फारसे खेळले नाहीत, पण त्यांनी देशांतर्गत क्रिकेट खेळताना आपल्या नावाचा दबदबा निर्माण केला होता. ते भारतीय संघाचे फलंदाजी प्रशिक्षक सुद्धा राहिले आहेत.
आता बांगर आपल्या मुलाला क्रिकेटचे धडे देत आहेत. संजय बांगर यांचा मुलगा आर्यन सुद्धा अष्टपैलू खेळाडू आहे. तो सध्या इंग्लंडमध्ये लिस्टरशरच्या ज्युनियर संघासाठी खेळणार आहे. आर्यन बांगरने बिहार ट्रॉफीमध्ये दमदार प्रदर्शन केले होते. जर त्याने असेच सातत्याने चांगली कामगिरी केली, तर तो भारतीय संघाकडून खेळताना पाहिला मिळू शकतो.
2. सचिन तेंडुलकर
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन सुद्धा अष्टपैलू खेळाडू आहे. अर्जुन डाव्या हाताने गोलंदाजी आणि फलंदाजी करतो. त्याने भारतीय 19 वर्षांखालील संघासोबत श्रीलंका दौरा केला आहे.
अर्जुन तेंडुलकरकडे गुणवत्ता आहे आणि शिवाय महान खेळाडू सचिनचे मार्गदर्शन ही आहे. त्यामुळे अर्जुन लवकरच आयपीएल स्पर्धेत सहभागी होवू शकतो. त्याचबरोबर आयपीएलमध्ये जर चांगले प्रदर्शन केले, तर भारतीय संघात सुद्धा त्याची निवड होऊ शकते.
3. राहुल द्रविड
भारतीय संघाची भिंत म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो ते व्यक्तिमत्त्व म्हणजे राहुल द्रविड. राहुल द्रविड याचा मुलगा समित सुद्धा क्रिकेट खेळतो. समित बेंगलोरमध्ये ज्युनियर स्तरावर क्रिकेट खेळत आहे.
त्याने आपल्या खेळीच्या जोरावर बर्याचदा लक्ष वेधून घेतले आहे. त्यामुळे द्रविडच्या मार्गदर्शनाखाली बरेच खेळाडू भारतीय संघात सामील झाले आहेत. त्यामुळे समित ही वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून भारतीय संघात खेळताना दिसू शकतो.
महत्त्वाच्या बातम्या-
“..म्हणून त्यांना लक्ष्य करणे चुकीचे”; सुनील गावसकरांनी केली भारतीय फलंदाजांची पाठराखण
अजब योगायोग! १९ डिसेंबर ठरली भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील खास तारीख
दणदणीत विजयानंतर ऑस्ट्रेलियन कर्णधाराने केले गोलंदाजांचे कौतुक, म्हणाला…