---Advertisement---

‘मी जे पाहिलंय, त्यावरून हे स्पष्ट आहे…’, विराटच्या बॅटिंगविषयी माजी कोचचे सनसनाटी वक्तव्य

Virat Kohli
---Advertisement---

आशिया चषक 2023 स्पर्धेला येत्या 30 ऑगस्ट पासून सुरवात होणार आहे. भारतीय संघ स्पर्धेतील पहिला सामना पाकिस्तान सोबत 2 सप्टेंबरला खेळणार आहे. यापूर्वी भारतीय संघीतील खेळाडू तयारीला लागले आहे. विराट कोहली पाकिस्तानविरुद्ध मोठी खेळी खेळू शकतो. भारतीय संघाचे माजी खेळाडू प्रशिक्षक संजय बांगर यांनी कोहलीच्या फलंदाजीवर प्रतिक्रिया दिली आहे.

माध्यमातील वृत्तांनुसार, संजय बांगर (Sanjay Bangar) म्हणाले की, “मी जे पाहिले त्यावरून हे स्पष्ट होते की विराट कोहली (Virat Kohli) मिड-विकेटला च्या दिशेला जास्त खेळण्याचा प्रयत्न करतो. आम्ही त्याला मोठे फटके आणि स्वीप शॉट्स खेळताना पाहिले आहे. पण कोहली क्वचितच स्वीप शॉट्स खेळतो. त्यामुळे विरोधी संघाकडून त्यानुसार क्षेत्ररक्षणही केले जाते. विराट बॅकफूट शॉट्स खूप खेळतो. यासाठी तो खेळपट्टीचा चांगल्या प्रकारे वापरतो.”

बांगर पुढे म्हणाले “विराट फलंदाजी करताना पायाचा चांगला वापर करतो. त्यामुळेच त्याचा खेळ चांगलाच गाजला आहे. काही काळ तो उंच आणि प्री-लॉक बॅकलिफ्ट शॉट्स खेळायचा. आता तो बॅट टॅपवर काम करत आहेत. या कारणास्तव नवीन शॉट्स बनवणे त्याच्यासाठी चांगले होत आहे.”

विराटची आशिया चषक वनडेमध्ये  पाकिस्तानविरुद्ध कारकीर्द
विराट पाकिस्तानविरुद्ध सामनाविर खेळी खेळू शकतो. त्याने आशिया चषक 2023 च्या वनडे प्रकारामध्ये त्याने आतापर्यंत 11 सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने 613 धावा केल्या आहेत. विराटने 3 शतके आणि एक अर्धशतक झळकावले आहे. त्याची सर्वोत्तम धावसंख्या 183 धावा आहे. विराटने पाकिस्तानविरुद्ध वनडे कारकिर्दीतील सर्वोत्तम धावसंख्या केली.

आशिया चषक 2023 स्पर्धेतील गट सामन्यांनंतर सुपर 4 सामने खेळवले जातील. या स्पर्धेचा अंतिम सामना 17 सप्टेंबर रोजी होणार आहे. भारतीय संघ आणि पाकिस्तान संघ आपल्या सामन्यासाठी पूर्व तयारीला लागले आहे. भारतीय संघ आशिया चषक 2023 चा प्रभळ विजेता होईल असे माणले जात आहे. तर पाकिस्तान  ही आपली संपूर्ण तयारी करताना दिसत आहे.

महत्वाच्या बातचम्या- 
अर्रर्र…! संघाच्या अध्यक्षानेच महिला फुटबॉल खेळाडूला सर्वांदेखत केलं किस, डिलीट व्हायच्या आत पाहा व्हिडिओ
अफगाणिस्तानच्या नांग्या ठेचल्या, ऑस्ट्रेलियाची बादशाहत संपवली, पाकिस्तानच्या शिरपेचात मानाचा तुरा!

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---