सध्या संयुक्त अरब अमिरातीत चालू असलेल्या आयपीएलच्या १३ व्या हंगामात एमएस धोनीचा चेन्नई सुपर किंग्स फ्लॉप ठरला आहे. दरम्यान धोनीलाही चांगले वैयक्तिक प्रदर्शन करण्यात अपयश आले आहे. तरीही त्याच्या लोकप्रियतेत मात्र कसालही फरक पडलेला नाही. अशात माजी भारतीय क्रिकेटपटू संजय बांगर यांनीही धोनीच्या लोकप्रियतेविषयी मोठे विधान केले आहे.
एमएस धोनीचे मंदीर बनेल!
स्टार स्पोर्ट्स आयपीएल २०२०शी संबंधित एका कार्यकर्मात बोलताना संजर बांगर म्हणाले की, “एमएस धोनी हे भारत देशातील खूप मोठे नाव आहे. चेन्नई सुपर किंग्स संघाचे चाहते तर त्याच्यावर जिवापाड प्रेम करतात. तमिळनाडूत ज्याप्रकारे अभिनेता रजनीकांत आणि जय ललिता यांच्यासाठी लोक वेडे आहेत. अगदी त्याचप्रमाणे धोनीबद्दलही तेथील लोक खूप भावनिक आहेत.”
“मला तर वाटते की येत्या काही वर्षांमध्ये तमिळनाडूत एमएस धोनीचे मोठे मंदीर देखील बनू शकते. असे घडल्यास मला जरासेसे आश्चर्य वाटणार नाही,” असे पुढे बोलताना संयज बांगर यांनी म्हटले.
भारत क्रिकेटवेड्या लोकांचा देश
तसे तर, भारत हा क्रिकेटवेड्या लोकांचा देश आहे असे म्हटले जाते. माजी भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडूलकरला देण्यात आलेली क्रिकेटचा देव ही उपमा हे याचे उत्तम उदाहरण आहे. तसेच धोनी, कपिल देव, सुनिल गावसकर, रोहित शर्मा, विराट कोहली अशा कित्येक भारतीय क्रिकेटपटूंचे लाखो-करोडो चाहते आहेत.
गुणतालिकेत शेवटचे स्थान
एमएस धोनी चेन्नई संघाचे यंदाचे प्रदर्शन चांगले राहिले नाही. त्यांनी आतापर्यंत हंगामातील १३ सामने खेळले असून त्यातील केवळ ५ सामने जिंकले आहेत. तर उर्वरित ८ सामन्यात त्यांना पराभव पत्कारावा लागला आहे. त्यामुळे सर्वात कमी १० गुणांसह त्यांचा संघ गुणतालिकेत शेवटच्या स्थानावर आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
युनिव्हर्स बॉसचा रुद्रावतार! ९९ धावांवर बाद झाल्यानंतर गेलने पुढे काय केले पाहाच
सासू-सुनेच्या भांडणामुळे सेहवागने केलं ‘हे’ काम, मग काय थेट आयसीसीने दिली चेतावणी
सीएसकेच्या ‘या’ खेळाडूबद्दल सचिनने केलेली भविष्यवाणी ठरली खरी; म्हणाला होता…
ट्रेंडिंग लेख-
CSK vs KKR सामन्यात ऋतुराज गायकवाडसह ‘या’ खेळाडूंनी केले खास ५ विक्रम
अन् भारताचा सर्वात वेगवान गोलंदाज दुखापतीमुळे क्रिकेटमधून कायमचा संपला
IPL 2020 – धोनीच्या ‘या’ पाच पठ्ठ्यांनी कोलकाताच्या सेनेला दाखवले आस्मान