भारतीय संघाचे माजी फलंदाजी प्रशिक्षक संयज बांगर यांनी सांगितले आहे की, युवा खेळाडू रिषभ पंत हा भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू एमएस धोनीचा सर्वात उपयोगी पर्याय आहे. कारण हा डावखुरा फलंदाज उजव्या हाताच्या फलंदाजांनी भरलेल्या मधल्या फळीत सहभागी झाल्यास संघ संतुलित बनेल.
हा २३ वर्षीय यष्टीरक्षक फलंदाज आयपीएल २०२०मध्ये कमालीचे प्रदर्शन करताना दिसत आहे. त्याने आतापर्यंत ५ सामने खेळत १७१ धावा केल्या आहेत.
पंतविषयी बोलताना बांगर म्हणाले की, “भारतीय संघातील यष्टीरक्षकाविषयी बोलायचं झालं तर, मला वाटते की पंत योग्य असेल. कारण, त्याने आयपीएलच्या तेराव्या हंगामाची धमाकेदार सुरुवात केली आहे. तसेच मला वाटते की, भारतीय संघाकडे एक डाव्या हाताच्या फलंदाजाचा पर्याय उपलब्ध असायला पाहिजे. विशेषता तेव्हा, जेव्हा संघाच्या मधल्या फळीत सर्व उजव्या हाताचे फलंदाज असतील. यामुळे संघात संतुलन निर्माण होते.”
बांगरच्या या वक्तव्याचे समर्थन करत आशिष नेहराने म्हटले की, “मी बांगर यांच्या निर्णयाशी सहमत आहे. मला वाटते की, भारतीय संघाने पंतला पाठिंंबा द्यायला हवा. त्याला सर्वांचे समर्थन मिळायला पाहिजे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रत्येक गुणवत्ता असलेल्या खेळाडूला दिग्गजांच्या समर्थनाची गरज असते.”
भारतीय संघाचा माजी यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनीने १५ ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. त्यामुळे संघाला त्याच्या योग्य पर्यायचा शोध आहे. अशात पंतला ही संधी मिळेल का नाही?, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
महत्त्वाच्या बातम्या-
सुपर-डुपर गोलंदाज-यष्टीरक्षक जोडी! आयपीएल इतिहासात पहिल्यांदाच केलाय ‘हा’ अनोखा विक्रम, वाचा सविस्तर
भुवनेश्वर कुमारच्या जागी हैदराबाद संघात निवड झालेला कोण आहे पृथ्वी राज यारा, घ्या जाणून
फिर से ‘हिट मॅन’! राजस्थानविरुद्ध अर्धशतक ठोकताच रोहितच्या नावावर होणार मोठा विक्रम
ट्रेंडिंग लेख-
असे ५ खेळाडू ज्यांनी आयपीएलमध्ये सलामीला आणि ८ व्या क्रमांकावर केली आहे फलंदाजी
दुर्दैवी…! आयपीएलमध्ये ९९ धावांवर बाद झालेले ३ फलंदाज; विराटचाही आहे समावेश