माजी भारतीय क्रिकेटपटू आणि माजी फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर यांच्या मुलाबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. संजय यांच्या मुलानं लिंगबदल केला आहे. तो हार्मोन ट्रान्सप्लांट सर्जरीद्वारे आर्यन बांगरचा अनया बांगर झाला!
आर्यन उर्फ अनायानं त्याच्या इंस्टाग्राम प्रोफाइलवर स्वतःचा एक व्हिडिओ शेअर केला होता, जो नंतर डिलिट करण्यात आला. या व्हिडिओमध्ये त्यानं सांगितलं की, गेल्या 10 महिन्यांतील त्याचा प्रवास खूपच वेगळा होता. तो हार्मोनल ट्रान्सफॉर्मेशनच्या टप्प्यातून जात होता. आर्यन म्हणतो की, त्याला अनया बनल्याचा आनंद आहे. त्याला नवीन नाव आणि नवी ओळख मिळाली. आता तो आर्यन म्हणून ओळखला जाणार नाही तर अनया म्हणून ओळखला जाईल.
आर्यन देखील त्याच्या वडिलांप्रमाणेच क्रिकेटपटू आहे. तो सध्या इंग्लंडच्या मँचेस्टरमध्ये राहतो. त्याच्या इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तो डावखुरा फलंदाज असल्याचं दिसतं. मात्र या परिवर्तनानंतर त्याच्या क्रिकेट कारकीर्दीला पूर्णविराम लागला आहे. शरीरात झालेले बदल आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ट्रान्स महिलांबाबत नियमांचा अभाव ही या मागची कारणं आहेत.
संजय बांगर हे 2014 ते 2019 पर्यंत भारतीय पुरुष संघाचे फलंदाजी प्रशिक्षक होते. त्यांनी टीम इंडियासाठी 12 कसोटी आणि 15 एकदिवसीय सामने खेळले आहेत. बांगर यांनी आयपीएल 2022 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे मुख्य प्रशिक्षक म्हणून काम पाहिले होते. त्यानंतर त्यांनी आयपीएल 2023 मध्ये पंजाब किंग्ज सोबत क्रिकेट विकास प्रमुख म्हणून काम केलं.
हार्मोनल ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे काय?
हार्मोनल ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे शरीरातील हार्मोन्सच्या प्रमाणात बदल. हार्मोन्स हे शरीराचे रासायनिक संदेशवाहक आहेत. या ग्रंथी अंतःस्रावी प्रणालीमध्ये तयार होतात आणि रक्तप्रवाहाद्वारे शरीराच्या अवयवांपर्यंत पोहोचतात. अवयवांनी काय करावं आणि केव्हा करावं याचा संदेश हार्मोन्स शरीराला देत असतात.
हेही वाचा –
वातावरण टाईट! विराट कोहलीच्या फॉर्मवरून गंभीर-पाँटिंगमध्ये तू-तू मैं-मैं
बॉर्डर-गावस्कर मालिकेपूर्वी गौतम गंभीरची पत्रकार परिषद, रोहित-विराटबाबत केलं मोठं वक्तव्य!
भारताचे सहज जिंकला असता सामना, सूर्यकुमार यादवच्या या चुकीमुळे पराभव झाला!