दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत (south africa vs India) या दोन्ही संघांमध्ये सोमवारपासून (३ जानेवारी ) दुसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली आहे. हा सामना भारतीय संघासाठी अतिशय महत्वाचा आहे. कारण, हा सामना जिंकून भारतीय संघाला मालिका आपल्या नावावर करण्याची सुवर्णसंधी असणार आहे. हा सामना सुरू होण्यापूर्वीच भारतीय संघाचा नियमित कर्णधार विराट कोहली दुखापतीमुळे संघाबाहेर झाला. त्याच्याऐवजी केएल राहुलला कर्णधारपद देण्यात आले आहे. तर, जसप्रीत बुमराह उपकर्णधाराची भूमिका पार पाडतोय. दरम्यान विराटने दुखापतीमुळे माघार घेतल्यामुळे दिग्गज क्रिकेटपटूने आश्चर्य व्यक्त केले आहे. (india tour of South Africa)
माजी भारतीय क्रिकेटपटू संजय मांजरेकर (Sanjay manjrekar) यांनी एका संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, “जेव्हा मी पाहिलं की केएल राहुल नाणेफेक करण्यासाठी येतोय, त्यावेळी मी आश्चर्यचकित झालो होतो. कारण, क्वचितच असे झाले असेल की, विराट कोहलीने कसोटी सामन्यातून माघार घेतली आहे. दुसरा कसोटी सामना हा अतिशय महत्वाचा सामना आहे. कारण, हा सामना जिंकून भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकण्याची सुवर्णसंधी आहे.”
तसेच ते पुढे म्हणाले की, “माझ्या मनात अनेक विचार येत आहेत. कोणाला माहित होते की, विराट कोहलीला दुखापत होईल. तो एक असा खेळाडू आहे, ज्याचा दुखापतीमुळे क्वचितच कसोटी सामना हुकला असेल. भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेत इतिहास रचण्याची सुवर्णसंधी असताना विराट कोहलीला दुखापत होणे ही खूप दुर्वैवी गोष्ट आहे. तो सध्या फॉर्ममध्ये नसला तरीदेखील तो नसल्याने भारतीय फलंदाजीला मोठा धक्का बसला आहे.”
या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत असलेल्या भारतीय संघाने २०२ धावा केल्या. ज्यामध्ये कर्णधार केएल राहुलने सर्वाधिक ५० धावांची खेळी केली. तर आर अश्विनने ४६ धावांचे योगदान दिले. दक्षिण आफ्रिका संघाकडून मार्को जेंसनने ४ गडी बाद केले. तर, ऑलिव्हियरने आणि कागिसो रबाडा यांनी प्रत्येकी तीन गडी बाद केले.
महत्वाच्या बातम्या :
ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूचा मोठा खुलासा, भारतीय दौऱ्यावर झाले होते लैंगिक शोषण
हे नक्की पाहा :






