---Advertisement---

“रोहितनं कसोटीत टी20 ची मानसिकता सोडावी”, संजय मांजरेकरांचा हिटमॅनला सल्ला

On: रविवार, ऑक्टोबर 27, 2024 4:36 PM
---Advertisement---

न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताचा 113 धावांनी पराभव झाला. यासह न्यूझीलंडनं तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली. मालिकेतील दुसरा कसोटी सामना पुण्यात खेळला गेला. या सामन्यावर माजी भारतीय क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वावरही भाष्य केलं. मांजरेकर म्हणाले की, रोहितनं कसोटीमध्ये टी20 सारखं खेळू नये.

सामन्यानंतर संजय मांजरेकर म्हणाले, “सरफराज खानला फलंदाजीसाठी खाली पाठवणं आणि वॉशिंग्टन सुंदरला त्याच्या वर पाठवणं, कसोटीत अशा गोष्टी चालत नाहीत. रोहित शर्माला एक गोष्ट टाळायची आहे. त्यानं टी20 मानसिकतेपासून दूर राहायला हवं. कसोटीत लेफ्ट आणि राईट हॅन्ड कॉम्बिनेशन साधण्याची गरज नाही. त्यानं फक्त त्याच्या खेळाडूंच्या क्षमतेनुसार पुढे जावं.”

पुणे कसोटीच्या पहिल्या डावात न्यूझीलंडनें 259 धावा केल्या. तर दुसऱ्या डावात 255 धावा केल्या. प्रत्युत्तरात, भारतीय संघ पहिल्या डावात 156 धावांवर गडगडला. यादरम्यान यशस्वी जयस्वाल आणि शुभमन गिल 30-30 धावांवर बाद झाले. रवींद्र जडेजानं 38 धावांचं योगदान दिलं. टीम इंडिया दुसऱ्या डावात 245 धावांवर गडगडली. यादरम्यान यशस्वी जयस्वालनं 77 धावांची खेळी केली. त्यानं 65 चेंडूंचा सामना करत 9 चौकार आणि 3 षटकार मारले. जडेजानं 42 धावा केल्या.

न्यूझीलंडनं बंगळुरू येथे झालेला मालिकेतील पहिला कसोटी सामना 8 गडी राखून जिंकला होता. तर संघानं पुण्यात झालेला दुसरा सामना 113 धावांनी जिंकला. आता भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना 1 नोव्हेंबरपासून मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला जाणार आहे.

हेही वाचा – 

टीम इंडियाला मिळाला नवा रन मशीन, फर्स्ट क्लास क्रिकेटमधील सरासरी डॉन ब्रॅडमनपेक्षाही जास्त!
काय सांगता! 2024 मध्ये टीम इंडियानं एकही वनडे सामना जिंकला नाही, यापूर्वी फक्त एकदाच असं घडलं
विराट कोहली सध्या त्याच्या कारकिर्दीतील सर्वात वाईट काळात, पदार्पण वर्ष देखील यापेक्षा चांगले!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---