---Advertisement---

‘संघनिवड’ ही बेंगलोरची मुख्य समस्या, माजी दिग्गजाने प्रश्न केले उपस्थित

---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीगच्या 13 व्या हंगामातील पहिला क्वालिफायर सामना शुक्रवारी (6 नोव्हेंबर) खेळला गेला. या सामन्यात विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा सनरायझर्स हैदराबादने 6 विकेट्सने पराभव केला. या पराभवामुळे बेंगलोरचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. 13 हंगाम खेळूनही बेंगलोरने एकदाही किताब पटकावला नाही. विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखाली मागील 8 वर्षात हा संघ फक्त 3 वेळा प्ले ऑफमध्ये पोहोचला आहे. संघाच्या खराब कामगिरीमुळे माजी भारतीय क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी बेंगलोरच्या संघनिवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे.

या हंगामातील मागील पाच सामन्यात बेंगलोरला पराभवाचा सामना करावा लागला. साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यातही संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता.मात्र प्लेऑफचे तिकीट मिळविण्यात संघाला यश आले. एलिमिनेटर सामन्यात संघाची फलंदाजी अतिशय खराब होती. स्वत: कर्णधार कोहलीही फलंदाजीसह काही खास करू शकला नाही. एबी डिविलियर्सने अर्धशतक ठोकले परंतु बेंगलोरच्या इतर फलंदाजांनी हैदराबादच्या गोलंदाजांसमोर संघर्षच केला.

प्रथम, माजी भारतीय सलामीवीर गौतम गंभीरने कोहलीला कर्णधारपदापासून दूर करण्याविषयी भाष्य केले होते. त्यानंतर आता माजी भारतीय क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी संघ निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. मांजरेकर यांनी ट्वीट केले की, “मैदानावर नेहमी काही गोष्टींची अंमलबजावणी करणे ही बेंगलोरची समस्या नाही. संघ निवड ही बेंगलोरची मुख्य समस्या आहे. वर्षानुवर्षे संघ आपल्यातील कमकुवतपणा दूर करण्यात अपयशी ठरला आहे. हा संघ आयपीएलमध्ये कमकुवत होत आहे.”

बेंगलोरने या स्पर्धेची शानदार सुरुवात केली होती, परंतु साखळी फेरीतील अखेरच्या काही सामन्यात संघाची कामगिरी निराशाजनक होती.

शुक्रवारी (6 नोव्हेंबर) अबु धाबीच्या शेख झायेद स्टेडियमवर डेविड वॉर्नरच्या नेतृत्त्वाखालील हैदराबादने बंगलोरला 6 गडी राखून पराभूत करून क्वालिफायर 2 मध्ये स्थान मिळवले. या सामन्यात हैदराबादचा अनुभवी फलंदाज केन विलियम्सनने 50 धावांची शानदार खेळी केली आणि संघाला विजय मिळवून दिला.

सन 2013 मध्ये कोहलीने या संघाची कर्णधारपदाची सूत्रे हाती घेतली होती. परंतु त्यानंतर संघ 8 हंगामात केवळ 3 वेळा प्लेऑफमध्ये पोहोचू शकला. 2016 च्या हंगामात हा संघ उपविजेता होता. परंतु मागील दोन हंगामात हा संघ गुणतालिकेत 2019मध्ये शेवटी, तर 2018 मध्ये सहाव्या स्थानी होता.

अबु धाबी येथे झालेल्या एलिमिनेटर सामन्यात बंगलोरचा स्टार फलंदाज एबी डिविलियर्सने 56 धावांची खेळी साकारली. परंतु हैदराबादच्या गोलंदाजांसमोर आरसीबीला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. या पराभवानंतर माजी भारतीय सलामीवीर गौतम गंभीर म्हणाला की, “कर्णधारपदासाठी बेंगलोरला विराट कोहलीच्या नावावर विचार करण्याची वेळ आली आहे. सोशल मीडियावरील अनेक वापरकर्त्यांनी विराट कोहलीवरही टीका केली.”

महत्त्वाच्या बातम्या-

-आनंदाची बातमी! ‘या’ छोट्या शहरात सुरु होतेय एमएस धोनीची क्रिकेट अकॅडेमी

-नटराजनच्या यॉर्कर समोर ‘मिस्टर 360’ सुद्धा फेल; उडवला थेट मधला स्टंप, पाहा व्हिडिओ

-“थँक्यू विराट”, हैदराबादविरुद्धच्या सामन्यातील ‘त्या’ निर्णयामुळे विराटची ट्विटरवर उडतेय खिल्ली

ट्रेंडिंग लेख-

-मुंबई इंडियन्सचे ४ दमदार खेळाडू; ज्यांना कधीही करू नये रिलीझ

-आयपीएलमधील ‘हे’ ४ संघ होणार मालामाल, पाहा विजेत्या- उपविजेत्या टीमच्या बक्षीसांच्या रकमा

-बेंगलोरचे तेराव्यांदा स्वप्नभंग होण्यास कारणीभूत ठरले हैदराबादचे ‘हे’ ५ शिलेदार

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---