भारताचा वेगवान गोलंदाज भूवनेश्वर कुमार मागच्या काही काळापासून चांगल्या गोलंदाजीचे प्रदर्शन करू शकलेला नाही. त्याने आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या टप्प्यात सनरायझर्स हैदराबादसाठी खूपच खराब प्रदर्शन केले आहे. त्याने दुसऱ्या टप्प्यातील पाच सामन्यात केवळ दोन विकेट्स मिळवल्या आहेत. रविवारी (३ऑक्टोबर) कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध झालेल्या सामन्यात भुवनेश्वरने एकही विकेट घतेली नाही, पण त्याच्या चार षटकांच्या कोट्यात केवळ २० धावा दिल्या.
अशात आता भारताचे माजी दिग्गज खेळाडू संजाय मांजरेकरांनी त्याच्याविषयी मत स्पष्ट केले आहे. मांजरेकरांनी भुवनेश्वर आणि मुंबई इंडिन्सचा ट्रेंट बोल्टची तुलना केली आहे.
तुम्ही त्याच्या गोलंदाजीवर टीका करू शकत नाही
मांजरेकरांनी इएसपीएन क्रिकेइंफोशी चर्चा करताना भुवनेश्वरविषयी त्याचे मत मांडले आहे. ते म्हणाले, “जेव्हा भुवीने इंग्लंडविरुद्ध मायदेशातील मालिकेत पुनरागमन केले, तेव्हा तो आश्वासन देत होता की, तो पुन्हा त्याच्या प्रमुख रूपात परत आला आहे. पण तेव्हा श्रीलंकेत असे वाटत होते की, तो शंभर टक्के फिट नाहीये. आता पुन्हा सुरु झालेल्या आयपीएलमध्ये स्पष्ट दिसत आहे की, तो त्याच्या फिटनेसच्या शिखरावर नाहीये.”
“सध्या तुम्ही त्याच्या गोलंदाजीसाठी त्याच्यावर टीका करू शकत नाही, कारण त्याच्या जबरदस्त फॉर्मसाठी एकमात्र कारण आहे की, तो कमी धावा देतो. पण त्याची गती आता धोडी कमी झाली आहे. ट्रेंट बोल्टही आता याच स्थितीत आहे, त्याच्या गतीवर परिणाम झाला आहे.”
भुवनेश्वर सनरायझर्स हैदराबादचा प्रमुख गोलंदाज आहे, पण या हंगामात तो काही कमाल करू शकलेला नाही. त्याने हंगामात ९ डावात केवळ तीन विकेट्स घेतल्या आहेत. तसेच तो अंतिम षटकातही काही खास करू शकलेला नाही. या संपूर्ण हंगामात भुवनेश्वरच्या खराब फार्ममुळे हैदराबाद संघाच्या अडचणी वाढलेल्या दिसल्या आहेत. असे असले तरी, आगामी टी २० विश्वचषकामध्ये भुवनेश्वरला भारतीय संघात सामील केले गेले आहे. अशात विश्वचषकात भुवनेश्वरचे भारतीय संघासाठी काय कमाल करून दाखवतो हे, पाहावे लागणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
वाईट झालं! पाकिस्तानाच्या ‘या’ खेळाडूच्या बहिणीचे निधन, भावनिक पोस्ट करत दिली माहिती
गुणतालिकेतील दोन अव्वल संघ येणार आमने-सामने; पाहा दोन्ही संघांची संभावित ‘प्लेइंग इलेव्हन’