भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत २-१ ने पराभूत (SA vs IND test series) झाल्यानंतर कसोटी संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला होता. तसेच कसोटी संघाचे कर्णधारपद सोडण्यापूर्वी त्याला वनडे संघाच्या कर्णधार पदावरून काढून टाकले होते. तसेच टी२० संघाच्या कर्णधार पदावरून त्याने स्वतःहून माघार घेतली होती. त्याची कर्णधार म्हणून कसोटी क्रिकेटमधील कामगिरी पाहता तो या स्वरूपातील सर्वोत्तम कर्णधारांपैकी एक आहे. परंतु, माजी भारतीय क्रिकेटपटूचे म्हणणे आहे की, विराट कोहली सर्वोत्तम कर्णधार नाहीये.
माजी भारतीय क्रिकेटपटू संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) यांनी न्यूज १८ सोबत बोलताना म्हटले की, “जेव्हा तुम्ही विराट कोहलीला पाहता, तेव्हा तुम्हाला त्याच्याबद्दलच्या खूप गोष्टी आवडतात. कारण तो एक असा व्यक्ती आहे, ज्याने अनेकांसमोर आदर्श ठेवले आहे. त्याने नेहमी भारताचे मनोबल वाढवले आहे.” (Sanjay Manjrekar statement)
अधिक वाचा – “हा निर्णय विराटच्या नेतृत्व कारकिर्दीतील मास्टरस्ट्रोक”
तसेच संजय मांजरेकर यांनी दावा केला आहे की, विराट कोहली सर्वकालिक कर्णधार नाहीये. याबाबत बोलताना ते म्हणाले की, “जेव्हा आपण सर्वकालिक कर्णधाराबद्दल बोलतो, तेव्हा एमएस धोनीचे नाव न घेणं अयोग्य ठरेल. कपिल देव यांनी त्यावेळी भारतीय संघाचे नेतृत्व केले ज्यावेळी जागतिक स्तरावर न्यूनगंड होते . तसेच सौरव गांगुलीने मॅच फिक्सिंग प्रकरणानंतर भारतीय संघाला परदेशात विजय मिळवून दिले.तसेच सुनील गावस्कर देखील चांगले लीडर होते. हे असे लोक आहेत, जे विराट कोहलीपेक्षा चांगले कर्णधार होऊन गेले.”
व्हिडिओ पाहा – ‘बाप बाप होता है…’ असं सेहवागने अख्तरला कधी म्हटलंच नव्हतं?
तसेच ते पुढे म्हणाले की, “आता आपण ज्या काळात जगतोय त्यामध्ये आपल्याला सर्व सोई सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे प्रत्येक गोष्टीचा प्रचार होतोय. परंतु भारतीय क्रिकेटची सुरुवात १० वर्षांपूर्वी झाली नव्हती. हे असे लोक आहेत, जे विराट कोहली पेक्षा श्रेष्ठ आहेत.”
महत्वाच्या बातम्या :
बीबीएलमध्ये धमाका केलेल्या पंचरत्नांवर असेल आयपीएल फ्रॅंचाईजींची नजर
हे नक्की पाहा: